दिल्लीच्या रिक्षावाल्याची होतेय देशभर चर्चा; 'हे' आहे कारण

Garden on Auto rickshaw Delhi News : दिल्लीतील एक रिक्षावाला प्रचंड व्हायरल झाला आहे. या रिक्षावाल्याने रिक्षावर (auto rickshaw) झाडांचे रोपटे लावले आहेत.
Delhi Auto Driver Creates small Garden On Roof
Delhi Auto Driver Creates small Garden On RoofSaam tv

नवी दिल्ली : संपूर्ण देशातील लोक उष्णतेने हैरान झाले आहेत. देशासहित दिल्लीतही तापमानाचे नवे विक्रम होत आहे. या दरम्यानच दिल्लीतील एक रिक्षावाला प्रचंड व्हायरल झाला आहे. या रिक्षावाल्याने रिक्षावर (auto rickshaw) रोपटे लावले आहेत. यामुळे हा रिक्षावाला कित्येकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. रिक्षावर रोपटे लावणारा अवलिया रिक्षावाल्याचे नाव महेंद्र कुमार आहे. त्याच्या रिक्षाचा फोटो व्हायरल झाल्यावर महेंद्रने माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. (Delhi Auto Driver Creates small Garden On Roof)

हे देखील पाहा -

महेंद्र म्हणाला की, गेल्यावर्षी उन्हाळ्यात रिक्षा उष्णतेने खूप तापायची. त्यामुळे त्याचा परिणाम रिक्षावर व्हायचा. उष्णतेने रिक्षामध्येही वातावरण प्रचंड उष्ण राहायचे. यामुळे रिक्षावर रोपटे लावायचा निर्णय घेतला. त्याने छोटे गार्डनच रिक्षावर तयार केले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे रिक्षावर रोपटे लावल्याने रिक्षा आता थंड राहते. महेंद्र कुमारच्या कल्पनेला लोकांकडून पसंती मिळताना दिसत आहे. महेंद्रच्या कल्पनेवर सोशल मीडियावर देखील तुफान प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर मंसूर नामक नेटकरी म्हणतो,'महेंद्र, तू कोणत्याही एका वाहन कंपनीसोबत या कल्पनेवर काम का करत नाही'

Delhi Auto Driver Creates small Garden On Roof
नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले; पत्नीचा संताप अनावर झाल्यानंतर भररस्त्यात राडा

दरम्यान, रिक्षावाला ( महेंद्र पुढे म्हणाला की, रिक्षावर रोपटे लावल्याने अनेक लोक खूश झाले आहेत'. तुम्ही रोपटे लावल्याने रिक्षात एसी लावल्याचा भासते, अशी प्रतिक्रिया त्याला दिल्या जात आहेत. तर अनेक लोक त्याला रिक्षात नैसर्गिक एसी लावला असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. रिक्षावर रोपटे लावून पर्यावरणाचे (environment) संरक्षण करण्यात महत्वाचा वाटा उचलत आहे, असेही महेंद्र म्हणाला. महेंद्र यांनी रिक्षावर रोपटे लावल्याने त्याने अनेक रिक्षावाल्यांसमोर एक नवे उदाहरण उभे केले आहे. तसेच अनेक लोक उष्णतेवर मात करण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com