Arvind Kejriwal: "केजरीवाल आतंकवादी नाही तर देशभक्तच, आजच्या निकालातून स्पष्ट"

आजच्या निवडणुकांच्या निकालावर पंजामधील 117 जागांपैकी 92 जागांवर AAP निवडून आली आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान म्हणजेच निवडनुकीत विजय मिळवला.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSaam Tv

Arvind Kejriwal On Punjab Elections Results: आजच्या निवडणुकांच्या निकालावर पंजामधील 117 जागांपैकी 92 जागांवर AAP निवडून आली आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान म्हणजेच निवडनुकीत विजय मिळवला. यासोबतच पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर रंधवा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांचाही विजय झाला आहे. या विजयावर अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार मानत भाषण केले. तसेच यावेळी केजरीवाल यांनी त्यांना आतंकवादी म्हणणाऱ्यांनाही या निकालावरून सडेतोड उत्तर दिले आहे.

आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी "वंदे मातरम"च्या घोषणेने केली. केजरीवाल म्हणाले, "पंजाबच्या लोकांनी कमाल केली आहे. "पंजाबवालीयो तुस्सी कमाल करदीत्ता" अश्या शब्दात पंजाबच्या लोकांचे आभार मानले.

केजरीवाल म्हणाले, "पंजाबमधील जागेसाठी अनेक चेहरे होते. पण निकाल आला अन् पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बंपर बहुमत मिळाले आहे. काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. एवढेच नाही तर सीएम चन्नी, नवज्योतसिंग सिद्धू, माजी सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग यांसारखे दिग्गज लोकांचा निवडनुकित यांचा पराभव झाला."

Arvind Kejriwal
Elections Results: त्यांनी ज्या "नोटा" वापरल्या त्याच्या पुढे आम्ही कमी पडलो- संजय राऊत

...ही सर्वात मोठी क्रांती;

पुढे ते म्हणाले, "आज जे पंजाबचे निकाल आले आहे ही एक इन्कलाब आहे. आज मोठं मोठ्या खुर्च्या हल्ल्या आहेत. सुखबीर सिंग बादल हरले. कॅप्टन चरणजित सिंग हरले, प्रकाशसिंग बदल हरले. नवज्योत सिंग सिद्धू हरले. विक्रम सिंग हरले. पंजाबच्या लोकांनी कमाल केला आहे. ही सर्वात मोठी क्रांती आहे."

केजरीवालांनी सांगितलं, "भगतसिंग म्हणाले होते, आझादी मिळाल्यावर सिस्टम नाही बदललं तर काहीच नाही होणार. ही दुःखाची बाब आहे कि, 75 वर्षांपासून या पार्ट्यांनी इंग्रजाचे सिस्टम ठेवले होते. देशाला लुटत होते. लोकांना जाणूनबुजून गरीब ठेवले. आम आदमी पार्टीने गेल्या 7 वर्षांपसून हे सिस्टीम बदलले आहे. आम्ही इमानदार राजनितीची सुरुवात केली आहे. मुलाना शिक्षा मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे स्वप्न पूर्ण होते आहे."

Arvind Kejriwal
'आम्ही शिवसेनाला मोजत नाही, मानत नाही'; निकालानंतर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया

"आतंकवादी मी नव्हे आतंकवादी तुम्हीच";

केजरीवाल पुढे म्हणाले, "पंजाबमध्ये मोठमोठे षडयंत्र केले. आपण रोज ऐकत होते या पार्टीचे लोक स्वतःचे वोट ऐकून ट्रान्स्फर करत होते. सगळे AAP विरोधात आले होते. सर्वांचे एकच ध्येय होते की, कोणतीही पार्टी विजयी होवो पण AAP विजयी नाही झाली पाहिजे. मोठमोठे षडयंत्र केले. शेवटी सर्व एकत्र येऊन म्हणाले केजरीवाल आतंकवादी आहे. मित्रहो, आज या निकालांमुळे, देशाच्या जनतेने की, केजरीवाल आतंकवादी नाही आहे. आज जनता ने सांगितलं आतंकवादी तुम्ही आहेत जे देशाला लुटत आहेत."

"आज आपल्याला संकल्प करायचा आहे की, आपण एक खरा भारत बनवू. जिथे कोणी उपाशी झोपणार नाही. जिथे आपल्या आई आणि बहिणींना सुरक्षित जगता येईल. आपण एक असा भारत बनवू जेथे पूर्ण जगातले मुलं भारतात शिकायला येतील. आजची क्रांती संपूर्ण देशात होणार आहे. सर्वांनी AAP पक्षात या," असे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com