Delhi Crime News: 11 महिन्यांत पैसे दुप्पट! चित्रपटाचा ट्रेलर दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक

11 महिन्यांत पैसे दुप्पट! चित्रपटाचा ट्रेलर दाखवून साडेतीन कोटींची फसवणूक
Delhi Crime News
Delhi Crime Newssaam tv

Delhi Latest Crime News: चित्रपटाचा ट्रेलर दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद नागर नावाच्या आरोपीला नोएडा येथून अटक केली आहे. यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचाही समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Delhi Crime News
PM Modi meets Ukraine President Zelensky: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि पंतप्रधान मोदींची समोरासमोर पहिलीच भेट, 'या' मुद्द्यावर झाली चर्चा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद आपल्या कंपनीच्या नावाने कार्यक्रम आयोजित करायचा. तिथे तो लोकांना काही चित्रपटांचे ट्रेलर दाखवायचा. त्यानंतर 11 महिन्यांत रक्कम दुप्पट करण्याचे लालूच तो लोकांना देत होता. (Latest Marathi News)

लोकही त्याने दाखवलेल्या आमिषाला बळी पडून त्याच्या कंपनीत लाखो रुपये गुंतवायचे. जेव्हा गुतंवणूकदार त्याला 11 महिन्यांनंतर फोन करायचे, तेव्हा तो त्यांच्या फोनचे उत्तर नाही द्यायचा किंवा लोकांनी त्याच्याशी संपर्क साधू नये म्हणून नंबर बदलत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे स्वॅग प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात अनेकांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. (Crime News)

तपासादरम्यान पोलिसांना कळले की स्वॅग प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उदित ओबेरॉय, प्रमोद नागर ज्युनियर आणि प्रमोद नागर सीनियर यांनी फक्त लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरु केली होती. यातील काही लोक स्वत:ला बनावट चित्रपट निर्मिती कंपनीचे दिग्दर्शक म्हणवून घेत होते. ते लोकांना त्याच्या कंपनीत गुंतवणूक करायला सांगायचे आणि 11 महिन्यांत दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे.

Delhi Crime News
Rs 2000 Note Withdrawn: दोन हजाराची नोट चलनातून बाद, आरबीआयने असा निर्णय का घेतला? बँकिंग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

लोकांची फसवणूक करण्यासाठी हे लोक कार्यक्रम आयोजित करत होते. तिथे काही चित्रपटांचे ट्रेलर ते लोकांना दाखवायचे. 11 महिन्यांत रक्कम दुप्पट होईल असं म्हणता त्यांनी सुमारे 47 जणांकडून 3 कोटी 50 लाख रुपये घेतले. या लोकांना सुरुवातीला काही दिवस रिटर्न मिळाले आणि त्यानंतर त्याला पैसे मिळणे बंद झाले तेव्हा लोकांना संशय आला. त्यांनी कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

नंतर लोकांनी पोलिसांकडे जाऊन याप्रकरणी एफआयआर नोंदवला. पोलिसांनी प्रमोद नागर ला ग्रेटर नोएडा परिसरातून अटक केली आहे. तर इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com