क्रूरता ! …संतप्त घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या
क्रूरता ! …संतप्त घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्याSaam Tv

क्रूरता ! …संतप्त घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या

राजधानी दिल्ली मध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि सासूची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली मध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि सासूची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खरे तर या हत्याप्रकरणात स्वत: आरोपी हा या हत्याप्रकरणात पोलिसांना स्वतः फोन करुन माहिती दिली आहे. त्यानंतर, पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी बाबा हा व्यक्ती आपल्या सासू- सासऱ्याकडेच राहत होता. यातूनच, वाद झाल्यामुळे आरोपीने सासूसह पत्नीची देखील हत्या केली आहे.

हे देखील पहा-

हरीदास नगर या ठिकाणी आपल्या पत्नीसह सासू- सासऱ्यांकडेच आरोपी हा राहत होता. यावरुन, घरजावई झालेल्या बाबा यांस सासू- सासरे नेहमी टोमणे मारत असत. रोजच्या या टोमणे आणि कुचकट बोलण्याला वैतागूनच आरोपीने पत्नी आणि सासूचा खून केला आहे. आरोपीने गोळी झाडल्याने दोन्ही महिलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. आरोपी महिलांची ओळख पत्नी निधी आणि सासू वीरो अशी पटविण्यात आली आहे.

क्रूरता ! …संतप्त घरजावयानेच केली सासू अन् पत्नीची हत्या
भारत-चीन सैन्य कमांडर्सची13 व्या फेरीची चर्चा आज; सैन्य मागे घेण्यावर दिला जाणार भर

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत: फोन करुन घडलेली घटना पोलिसांना सांगितली आहे. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनाकरिता सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आणि आरोपी बाबाला अटक करण्यात आली आहे. तसेच, आरोपीकडून पुढील अधिक तपास सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com