Manish Sisodia News: मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत मोठी वाढ; CBI चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच आलं नाव

Manish Sisodia News: उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Manish Sisodia case
Manish Sisodia caseSAAM TV

Manish Sisodia News: उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्यांदाच सीबीआयच्या चार्जशीटमध्ये आले आहे. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणात सीबीआयने मंगळवारी राऊस एव्हेन्यू न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. (Latest Marathi News)

ज्यामध्ये प्रथमच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त बुची बाबू, अमनदीप सिंग धल्ल आणि अर्जुन पांडे यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Manish Sisodia case
Paithan Crime News: पैठण हादरलं! नवऱ्याचं अपघाती निधन; तेराव्याच्या दिवशीच दिराचं वहिनीसोबत भयानक कृत्य

आरोपपत्राची दखल घेण्यासाठी न्यायालयाने १२ मे रोजी सकाळी १०.३० वाजेची वेळ दिली आहे. सिसोदिया यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०बी, २०१ आणि ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७ए, ८ आणि १३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबतही ईडी सिसोदिया यांची चौकशी करत असून, सिसोदिया हे उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत आहे. दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणात दारूच्या व्यापाऱ्यांना परवाने देण्यासाठी काही डीलर्सना फायदा झाला होता, या डीलर्सनी सिसोदिया यांना लाच दिल्याचा आरोप केला जात आहे.  (Breaking Marathi News)

Manish Sisodia case
Raigad Bus Accident: शिवशाही बसला कर्नाळा घाटात भीषण अपघात, भरधाव बस 40 प्रवाशांसह उलटली

केंद्रीय तपास यंत्रणेने 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक केली. अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबतही ईडी सिसोदिया यांची चौकशी करत असून, सिसोदिया हे उत्पादन शुल्क धोरणातील भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत आहे.

मनीष सिसोदिया २९ एप्रिलपर्यंत कोठडीत

यापूर्वी, १७ एप्रिल रोजी दिल्लीतील विशेष न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांच्या न्यायालयीत कोठडीत वाढ केली होती. दोन्ही प्रकरणातील न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी २७ एप्रिलपर्यंत आणि ईडी प्रकरणात २९ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com