Crime News: कसला हा निर्दयीपणा! मावशीचे क्रूर कृत्य, भाचीला ५५ हजाराला विकले; जबरस्तीने करवून घेतला वेश्या व्यवसाय

Delhi Govindpuri Crime: पीडित तरुणीच्या आई वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे ती ती आपल्या मावशीसोबत राहत होती.
Delhi Crime News
Delhi Crime News saam tv

Delhi Crime News: पैशासाठी मावशीनेच भाचीला ५५ हजार रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक घटना दिल्लीमधील गोविंदपुरीमध्ये (Govindpuri) घडली आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पीडित तरुणीने कशीबशी त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटली आणि एका एनजीओच्या (NGO) मदतीने पोलिसांपर्यंत पोहोचली. दिल्ली पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. (Latest Marathi News Update)

Delhi Crime News
Viral Video: काय बोलायचं आता! मटण, चिकननंतर आता आले चुलीवरचे बाबा; VIDEO पाहून नेटकरीही चक्रावले; चक्क पेटलेल्या...

याबाबत गोविंंदपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीच्या आई वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे ती ती आपल्या मावशीसोबत राहत होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या मावशीने आरोपी नंदूला 55 हजार रुपयांना विकले होते. नंदूही गोविंदपुरीत राहतो. तसे ते मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, नंदूने तिला विकत घेतले आणि आपल्या घरी नेले आणि नंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

तसेच अनेकांनी तिच्यावर अत्याचार केल्याचेही तिने सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी एक व्यक्ती तिचा विनयभंग करण्यासाठी आला होता. मात्र, तिने चकमा देत तेथून पळ काढला. यावेळी तिला एका एनजीओचा पत्ता मिळाला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. एनजीओशी संबंधित लोकांनी तिला पोलिसांकडे नेले. सध्या पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Delhi Crime News
Accenture Layoff : आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर मंदीच वादळ; Accenture कंपनीच्या १९,००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या पथकाने पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याआधारे आरोपीविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी नंदू याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. पोलीस आरोपी महिलेचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत आहेत. (Delhi Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com