IMD Rains Alert: पावसाचा दिल्लीत कहर, आजही दिलासा नाही; ठीक ठिकाणी साचलं पाणी

दिल्लीमध्ये अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
Delhi Weather
Delhi WeatherSaam Tv

IMD Rainfall Update: दिल्लीमध्ये (Delhi)अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली प्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rainfall) पडत आहे. दिल्ली-एनसीआर आणि गुरुग्राममधील अनेक भागातही पाणी साचलं आहे. परिस्थिती पाहता गाझियाबाद, आग्रा, फिरोजाबाद, मैनपुरी, नोएडा, इटावा येथील शाळांना आज सूयुती जाहीर करण्यात आली आहे.

Delhi Weather
Chandur Railway : मुलीला पळवून नेणा-या नईम खान खून प्रकरणी चाैघे अटकेत

या भागात पावसाचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, गाझियाबाद, इंदिरापुरम, छपरौला, नोएडा, दादरी, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, बल्लभगढ, कैथल, नरवाना, कर्नाल, फतेहाबाद आणि त्याच्या लगतच्या भागात पुढील काही तासांत हलका ते मध्यम पाऊस पडेल. मुसळधार पाऊस पडेल.

दुसरीकडे, हरियाणातील राजौंड, असंध, आदमपूर, हिस्सार, हंसी, सिवानी, मेहम, तोशाम, रोहतक, भिवानी, चरखी दादरी, मत्तनहेल, झज्जर, फारुखनगर, कोसली, महेंद्रगड, सोहाना, रेवाडी, पलवल, नारनौल, बावल, नूहमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारीही पाऊस सुरूच राहणार आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोठ्या शहरांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना घरे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतही पावसाची रिपरिप सुरू आहे.

उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या या भागात पावसाची शक्यता

उत्तर प्रदेशातील होडल अमरोहा, मुरादाबाद, रामपूर, बिल्लारी, जट्टारी, खैर, नांदगाव, बरसाना, राया, मथुरा येथे जोरदार पाऊस होईल. राजस्थानच्या सिद्धमुख, भिवडी, तिजारा, खैरथल, कोटपुतली, अलवर, नगर, लक्ष्मणगढ, नादबाई, महावा, महानीपूर बालाजी, बयाना येथे येत्या २४ तासांत पावसाची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com