Delhi MCD Election Result : भाजपा की आप? दिल्ली महापालिकेत सत्ता कोणाची?, थोड्याच वेळात होणार स्पष्ट

महापालिकेत भाजपा 15 वर्षांची सत्ता कायम ठेवणार की आम आदमी पक्ष बाजी मारणार? हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
Delhi MCD Election Result Live Updates
Delhi MCD Election Result Live UpdatesANI

Delhi MCD Election Result Live Updates : दिल्ली महानगरपालिकेच्या दृष्टीनं आजचा दिवस खूपच असणार महत्वाचा आहे. कारण, आज दिल्ली महापालिकेचा कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून दिल्ली महापालिकेच्या मतमोजणीची सुरूवात झाली आहे. महापालिकेत भाजपा 15 वर्षांची सत्ता कायम ठेवणार की आम आदमी पक्ष बाजी मारणार? हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

Delhi MCD Election Result Live Updates
CM शिंदेंच्या फोननंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं सूचक ट्विट; सीमावादावर केलं मोठं भाष्य

दिल्लीतील 250 वॉर्डसाठी 1 हजार 349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. मतमोजणीसाठी 42 केंद्रे तयार करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये, जवळपास सर्व सर्वेक्षण संस्थांनी आम आदमी पार्टीच्या विजयाचा आणि भारतीय जनता पक्षाच्या 15 वर्षांच्या राजवटीचा अंत होण्याचा अंदाज वर्तवला आहे. एक्झिट पोलनुसार आपला या निवडणुकीत 149 ते 171 जागा मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भाजपला 69 ते 91 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या खात्यात 03 ते 07 जागांवर काँग्रेसचा विजय होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील व्होट शेअरिंगबद्दल बोलायचे झाले तर आम आदमी पक्षाला 43 टक्के, भाजपला 35 टक्के आणि काँग्रेसला 10 टक्के मते मिळू शकतात, असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

शेवटची दिल्ली महापालिका निवडणूक 2017 मध्ये झाली होती. तेव्हा महापालिकेच्या एकूण वॉर्डांची संख्या 272 होती. या निवडणुकीत भाजपने 181, आप 48, काँग्रेस 30 आणि इतर 11 जागा जिंकल्या होत्या. दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा हा सलग तिसरा विजय ठरला होता.

सध्या दिल्ली महापालिका निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध भाजप असंच चित्र आहे. नगरसेवकांची संख्या पाहता, तिन्ही महानगर पालिकांच्या एकत्रीकरणानंतर आता दिल्ली महानगर पालिका देशातली सर्वांत मोठी महानगर पालिका बनली आहे. याआधी बृहन्मुंबई महानगर पालिका ही देशातली सर्वांत मोठी महानगर पालिका होती.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com