निर्दयी आईचा क्रूर चेहरा; पोटच्या मुलीचे हातपाय बांधून छतावर तळपत्या उन्हात झोपवलं

Delhi Child Violence News : भारतात अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार करणे अथवा हिंसा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
निर्दयी आईचा क्रूर चेहरा; पोटच्या मुलीचे हातपाय बांधून छतावर तळपत्या उन्हात झोपवलं
Delhi Child Violence NewsTwitter/@ANI

नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत (New Delhi) एक अतिशय संतपाजनक घटना घडली आहे. एका आईने आपल्याच मुलीचे हात-पाय बांधत त्या मुलीला तळपत्या उन्हात घराच्या गच्छीवर जबरदस्तीने झोपवले आहे. ही तालिबानी शिक्षा देतानाचा निर्दयी आईचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलीसह अॅक्शनमध्ये आले आणि या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. दिल्लीच्या खजूरी खास परिसरातील तुकमीरपुर गल्ली क्र. २ येथील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या निर्दयी आईवर सर्वत्र टीका होत आहे. भारतात अल्पवयीन मुला-मुलींवर अत्याचार करणे अथवा हिंसा करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे आता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Delhi minor girl class 1 student was tied with a rope & left on terrace as "punishment" for not doing homework, her mother told police)

हे देखील पाहा -

घडलेल्या प्रकाराबाबत आईने आपली बाजू मांडली आहे. या आईने म्हटलं की, "मुलीने शाळेत दिलेला घरचा अभ्यास (होमवर्क) केला नाही. म्हणून तिचे हात-पाय बांधत तिला घराच्या गच्चीवर झोपवलं. पण तिला केवळ ५ ते ७ मिनिटे शिक्षा दिली, नंतर मुलीला घरात आणलं" असं या आईचं म्हणणं आहे. याप्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून यात सदर मुलीची आई दोषी आढळ्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

आईला काय शिक्षा होऊ शकते?

अशा हल्ल्यांपासून किंवा गुन्ह्यांपासून लहान मुले आणि अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी जुवेनाईल जस्टिस कायद्यात (Juvenile Justice) शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. या कायद्यात असे नमूद केले आहे की, जी कुणी व्यक्ती बालकांवर अत्याचार करते, विनाकारण छळ करते, मानसिक किंवा शारीरिक, कोणत्याही प्रकारे त्याच्यावर जाणूनबुजून हल्ला करते, तर त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

पण या कायद्यात एक पेचही आहे. तो असा की, जर असे आढळून आले की जैविक पालकांनी (जन्म देणारे मूळ पालक) त्यांच्या मुलाशी जाणूनबुजून अशी वागणूक दिली नसेल आणि सर्व काही त्यावेळच्या परिस्थितीनुसार झालं असेल तर त्यांना शिक्षा होऊ शकत नाही. या प्रकरणात, आईने आपल्या मुलीशी जे केले ते जाणूनबुजून केलेले नाही हे सिद्ध झाल्यास, महिलेला यातून सूट मिळू शकते. मात्र, हा सर्व तपासाचा विषय आहे. तपास पुर्ण झाल्यावरच खरं समोर येईल.

आणखी काय शिक्षा असू शकते?

बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार, जर एखादी व्यक्ती एखाद्या मुलाच्या संगोपनासाठी आणि संरक्षणासाठी जबाबदार असलेल्या संस्थेशी संबंधित असेल आणि त्याने मुलाविरुद्ध कोणताही गुन्हा केला असेल तर, त्याला ३ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आणि ५ लाखांपर्यंतच्या दंडासह शिक्षा होऊ शकते.

याशिवाय, मारहाण किंवा मारहाणीमध्ये बालक शारीरिकदृष्ट्या अक्षम किंवा अपंग झाल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक विकारग्रस्त झाल्यास किंवा हल्ल्यामुळे त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास, अशा प्रकरणात आरोपीला ३ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. सोबत ५ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षाही होऊ शकते.

तसेच जर कोणी लहान मुलांना भीक मागायला लावत असेल तर त्याला ५ वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर भीक मागण्याच्या उद्देशाने एखाद्या बालकाला अपंग बनवल्यास आरोपीला ७ ते १० वर्षे कारावास आणि ५ लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.

जगातील कायदा काय सांगतो?

जगातील ६३ देशांमध्ये लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी कायदे आहेत. स्वीडन हा जगातील पहिला देश आहे, जिथे याविरोधात पहिला कायदा करण्यात आला. स्वीडनमध्ये १९७९ पासून बाल अत्याचार रोखण्यासाठी कायदा आहे. इथे लहान मुलांची छेड काढणे किंवा त्यांना मारहाण करणे हा गुन्हा आहे. असे केल्यास २ वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

Delhi Child Violence News
नवरदेवाशिवाय लग्न पार पडलं, तिने स्वतःच्याच भांगेत सिंदूर भरलं... (पाहा Photos)

स्वीडननंतर फिनलॅंड हा दुसरा देश आहे जिथे असे करणे गुन्हा आहे. १९८३ पासून येथे कायदा आहे. येथे मुलांवर हल्ला करणे, मारहाण करणे किंवा घरी किंवा बाहेर त्यांचा छळ करणे हा गुन्हा आहे आणि असे केल्यास ५ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

कोरिया, जपान, आयर्लंड, आइसलँड, जर्मनी, लाटविया, नॉर्वे, ऑस्ट्रिया, हंगेरी, रोमानिया आणि युक्रेन असे ६३ देश आहेत जिथे मुलांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला, हल्ला किंवा छळ करणे हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते. या देशांत लहान मुलांवर होणारा हिंसाचार हाही घरातच गुन्हा मानला जातो.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com