Delhi Weather : दिल्ली-एनसीआरमध्ये दाट धुके अन् थंडीची लाट; ऑरेंज अलर्ट जारी

दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी
Winter Season
Winter Seasonsaam tv

Delhi Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. दिल्लीत थंडगार वारे वहात असल्याने दिल्लीकर अक्षरशः कुडकुडत आहेत. कडाक्याच्या थंडीत दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्ये दाट धुक्याच्या चादर पसरली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने सर्व वाहनांचा वेगही मंदावला.

Winter Season
kalsubai shikhar : कळसुबाई शिखरावर रेकॉर्डब्रेक गर्दी; अपघातांचा धोका

दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक पहाटे शेकोटीचा आधार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, या थंडीपासून आता दिल्लीकरांना दिलासा मिळणार आहे. IMD ने रविवारी (8 जानेवारी) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-NCR आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट मंगळवारपासून कमी होणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) 9 जानेवारीलाही कडाक्याची थंडी आणि धुक्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. IMD ने आज, 9 जानेवारी 2023 रोजी दिल्लीऑरेंज अलर्ट जारी केला आहे. थंडी आणि धुक्याच्या दुहेरी तडाख्याचा सामना करणाऱ्या दिल्लीत दृश्यमानता कमी झाल्यामुळे उड्डाणांवरही परिणाम होत आहे. 

Winter Season
Vinayak Raut : 'राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात'; खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका

त्याचबरोबर रेल्वे देखील नियोजित वेळेपासून उशिराने धावत आहेत. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी देशातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com