Delhi-NCR Weather: दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा हाहाकार; अलर्ट जारी, शाळा बंद

हवामान खात्यानुसार, 26 सप्टेंबरपर्यंत दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर पाऊस थांबेल, असे मानले जात असले तरी आकाश ढगाळ राहील.
Delhi Weather
Delhi WeatherSaam Tv

Delhi-NCR Weather Update: दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती दयनीय झाली आहे. पावसामुळे दिल्ली-एनसीआरच्या विविध भागात पाणी साचले आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारीही दिल्लीत पाऊस कायम राहणार आहे. पावसाची शक्यता पाहता हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. (Delhi-NCR Weather)

Delhi Weather
Petrol Diesel: पेट्रोल- डिझेल होणार स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

हवामान खात्यानुसार, २६ सप्टेंबरपर्यंत दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर पाऊस थांबेल, असे मानले जात असले तरी आकाश ढगाळ राहील. याशिवाय नोएडा आणि गुरुग्राममधील हवामान दिल्लीसारखच असण्याची अपेक्षा आहे. याआधी गेल्या 24 तासात दिल्लीतील पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पावसामुळे वायू प्रदूषण पुन्हा एकदा कमी झाले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 28-29 सप्टेंबरच्या आसपास मान्सून दिल्ली-एनसीआरमधून माघार घेऊ शकतो. दुसरीकडे, गुरुग्राम, नोएडा-ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबादमधील सर्व शाळा शुक्रवारी पावसाच्या शक्यतेमुळे बंद करण्यात आल्या आहेत. गुरुग्राममध्ये शुक्रवारी पावसाची शक्यता पाहता, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व कॉर्पोरेट आणि खाजगी संस्थांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे.

शुक्रवारी दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये हवामान कसे असेल?

गुरुवारी दिल्लीतील किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा एक कमी आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 7 अंश सेल्सिअस कमी होते.

हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 96 ते 100 टक्के होते.

शुक्रवारी दिल्लीत कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. आकाश ढगाळ राहील. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

नोएडामध्ये कमाल तापमान 27 आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुरुग्राममध्ये कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असेल आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com