Crime : दिल्ली पुन्हा हादरली! श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती; मृतदेहाचे नाल्यात आढळले 3 तुकडे

दिल्लीत पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखी घटना दिल्लीत घडली आहे.
Crime News
Crime News Saam TV

Delhi Crime News : दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखी घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत मृतदेहाचे तीन तुकडे करुन नाल्यात टाकल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Crime News
Stampede in Odisha : मकर संक्रातीच्या मेळाव्यात चेंगराचेंगरी; २ जण ठार, लहान मुलांसहित १२ जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील (Delhi) भलस्वा येथील नाल्यात मृतदेहाचे तीन तुकडे आढळले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दोन संशयित दहशतवादी व्यक्तींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर दिल्ली पोलिसांच्या (Police) स्पेशल टीमची कारवाई केली आहे.

पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी नौशाद आणि जगजीत सिंह यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या संशयित आरोपींना गुरुवारी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाने या दोनही आरोपींना शुक्रवारी 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयित दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर यांच्या घरी पोलिसांनी टाकलेल्या रेडमध्ये पोलिसांना 3 पिस्तुल, हॅन्डग्रेड आणि 22 जिवंत काडतुसं मिळाली आहे.

Crime News
Delhi New : दिल्ली पुन्हा हादरली! तरुणाला कारच्या बोनटवरून अर्धा किलोमीटर फरफटत नेले; VIDEO

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जगजीत सिंह याचा खालिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध आहे. दुसरा आरोपी नौशाद देखील ‘हरकल अल अन्सार’ HUA या दहशतवादी गटाशी असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या दोनही आरोपींच्या विरोधात युएपीएच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com