महाराष्ट्रात शिवसेनेचे झाले, तेच दिल्लीत आपचे होण्याची शक्यता; काही आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर

दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे.
AAP Vs BJP Delhi News
AAP Vs BJP Delhi NewsSaam TV

नवी दिल्ली: दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजप दिल्लीत देखील 'ऑपरेशन लोटस' करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच 'आप'चे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. (Aam Aadmi Party and BJP)

यामुळे आपचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज सकाळी 11 वाजता त्यांच्या निवास्थानी आम आदमी पक्षाची बैठक बोलावली. या बैठकीसाठी सर्व आमदारांना (MLA) आमंत्रीत करण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ -

मात्र, या बैठकीपूर्वीच भाजप (BJP) 'आप'चे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून केला जात आहे. भाजप दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

भाजपने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. शिवाय ज्या राज्यात आपली सत्ता नाही त्या ठिकाणी विरोधी पक्षातील आमदार फोडून भाजप आपली सत्ता स्थापन करुन त्याला 'ऑपरेशन लोटस' असं नावं देतं.

कर्नाटक, गोवा आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील आपली सत्ता भाजपने स्थापन केली आहे. तोच फॉर्म्युला वापरत भाजप दिल्ली देखील काबीज करणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.

AAP Vs BJP Delhi News
Breaking News : मनसे प्रमुख राज ठाकरेंना पाेलिसांनी बजावली नाेटीस

मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीपुर्वी आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. तसंच आपच्या अनेक आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही.

यापूर्वी देखील आम आदमी पक्षाच्या 4 आमदारांना 20 कोटींची ऑफर देत धमकावल्याचा आरोप केला होता. तर उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील आप सोडून आमच्याशी हात मिळवा असा संदेश भाजपकडून आल्याचा दावा त्यांनी केला होता.

दरम्यान, ताज्या अपडेटनुसार आता आपचे सर्व आमदार संपर्कात असून त्यापैकी 53 आमदार बैठकीला पोहोचले आहेत. एक आमदार वाटेत. तर 8 आमदार दिल्लीबाहेर असल्याची माहिती आपकडून देण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com