Delhi Saket Court Firing: वकील बनून आला अन् पत्नीवर गोळ्या झाडल्या; दिल्लीच्या साकेत कोर्ट परिसरातील घटना

Delhi Court Firing News: आज सकाळी झालेल्या गोळीबारामुळे दिल्लीतील साकेत न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे.
Delhi Saket Court Firing
Delhi Saket Court FiringSaam Tv

New Delhi News: दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात आज सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे साकेत कोर्ट परिसरात खळबळ उडाली आहे. येथे वकिलाच्या पेहरावात एका व्यक्तीने महिलेवर गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महिलेची प्रकृती गंभीर असून एम्स रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत. (Breaking Marathi News)

साकेत कोर्टात पती-पत्नीचा एक खटला सुरू होता. पीडित महिला आज न्यायालयात साक्ष देण्यासाठी आली होती. तेव्हाच वकिलाच्या वेशात येऊन पतीने लॉयर्स ब्लॉकजवळ तिच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.आरोपीने महिलेवर चार गोळ्या झाडल्या ज्या तिच्या पोटात आणि इतर भागात लागल्या. या हल्ल्यानंतर हल्लेखोर न्यायालयातून फरार झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र, न्यायालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त असताना घडलेल्या या घटनेनं सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Delhi News)

Delhi Saket Court Firing
Sanjay Raut On Raj Thackeray: 'भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा...'; संजय राऊतांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा निलंबित वकील असून दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होता, त्यातूनच त्याने गोळी झाडली. महिलेचा पती हिस्ट्रीशीटर गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत असून आरोपीची ओळख पटली आहे. मात्र, पोलिसांकडून (Police) अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, ही व्यक्ती दिवसाढवळ्या शस्त्रे घेऊन न्यायालयात कशी पोहोचली, असा प्रश्न साकेत न्यायालयाच्या सुरक्षेवरही उपस्थित केला जात आहे. न्यायालयाच्या मुख्य गेटवर मेटल डिटेक्टरही आहे असे असतानाही ही घटना घडली. अशा परिस्थितीत साकेत न्यायालयातील सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com