
Delhi News : देशाची राजधानी दिल्लीमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दिल्ली कंझावाला प्रकरण, श्रद्धा वालकर प्रकरणाने हादरलं आहे. त्यानंतर आता चक्क दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. त्याबरोबर स्वाती मालीवाल यांना रात्री कारने फरफटत नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (Latest Marathi News)
वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, दिल्ली (Delhi) पोलीस आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दक्षिण जिल्ह्याचे डीसीपी चंदन सिंह यांनी सांगितले की, 'आज एक कॉल आला होता.
एका महिलेला कार चालकाने घाणेरडे इशारे करत १०-१५ मीटर फरफटत नेले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे वय ४७ असून तो दारूच्या नशेत होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
डीसीपी चंदन सिंह यांनी सांगितले की, 'रात्री उशिरा ३ वाजून ११ मिनिटाला AIIMS च्या गेट क्रमांक २ जवळ हा प्रकार घडला. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कारने १० ते १५ मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यांचा हात खिडकीत अडकला. त्यानंतर कारने १० ते १५ मीटरपर्यंत फरफटत नेले'.
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ४७ आरोपी हरिश चंद्र असे असून तो दारूच्या नशेत होता. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी आणि पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
स्वाती मालिवाल यांनी ट्वीट करत म्हटले की, 'काल रात्री महिला सुरक्षेचा तपास करत होते. एक कार चालकाने नशेत माझा विनयभंग केला. मी त्याला पकडलं. त्यामुळे त्याने कारच्या काचा बांद केल्या. देवाने माझे प्राण वाचवले. दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षा सुरक्षित नाही, तर विचार करा'..
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.