लाचखोर इंजिनिअरचा देसी जुगाड; पाईपमध्ये लपवल्या 13 लाखांच्या नोटा

ज्युनिअर इंजिनिअरची कोट्यवधींची संपत्ती जप्त
लाचखोर इंजिनिअरचा देसी जुगाड; पाईपमध्ये लपवल्या 13 लाखांच्या नोटा
लाचखोर इंजिनिअरचा देसी जुगाड; पाईपमध्ये लपवल्या 13 लाखांच्या नोटा Saam Tv

बंगळुरु - कर्नाटकातील बंगळुरुमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका ज्युनिअर इंजिनिअरची स्वप्नं धुळीस मिळवली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या ज्युनिअर इंजिनिअरची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आली आहे.

हे देखील पहा -

कर्नाटकातील या इंजिनिअरने चक्क रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या पाईपमध्ये 13 लाख रुपये लपवले होते. कर्नाटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी कलबुर्गी येथील या ज्युनिअर इंजिनिअरच्या घरातून सुमारे 13 लाख रुपये रोख जप्त केले आहे.

लाचखोर इंजिनिअरचा देसी जुगाड; पाईपमध्ये लपवल्या 13 लाखांच्या नोटा
आवक घटल्याने टोमॅटोने गाठली 'शंभरी'

सार्वजनिक बांधकाम विभागात ज्युनिअर इंजिनिअर म्हणून एस. एम. बिरादार काम करतात. त्यांच्या ठिकाण्यांवर छापा टाकला असता दोन घरं, बंगळुरुमधील एक जागा, तीन कार, एक दुचाकी, एक स्कूल बस, दोन ट्रॅक्टर, 54.50 लाख रुपयांची रोकड, 36 एकर शेतजमीन, 100 ग्रॅम दागिने आणि 15 लाख रुपये किमतीच्या घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा या त्याला ज्युनिअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com