devendra fadnavis
devendra fadnavisSaam Tv

विराेधकानं आवाज केल्यास त्याचे ४ दिवसांनी प्रेत दिसतं : फडणवीस

दिल्ली, काेलकत्तामधील पक्ष निवडणुकीपूरते येतात आणि हरल्यानंतर पुन्हा मार्गस्थ हाेतात.

गाेवा (goa election 2020 news) : पश्चिम बंगालमध्ये (west bengal) सर्वाधिक गुन्हेगारी, अत्याचार आहे. तेथे आैद्यागिकीकरण नाही. एकही कारखानादार तेथे जात नाही. सर्वाधिक बेराेजगारी बंगालामध्ये का आहे याचे उत्तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banarjee) या देतील का असा प्रश्न भाजप नेते (bjp) देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी येथे उपस्थित केला आहे. विराेधी पक्षातील नेत्याने सत्ताधा-यांना एखादा प्रश्न, विषय मांडला अथवा आवाज उठविला तर चार दिवसांनी त्याचे प्रेत आढळते अशा प्रकारची तानाशाही बंगालमध्ये असल्याचा आराेप फडणवीसांनी ममता बॅनर्जी सरकारवर केला.

गाेव्यात (goa) दिवसेंदिवस विधानसभेच्या निवडणुकीचे (goa assembly election 2022) वातावरण तापू लागले आहे. आज आमदारकीचा राजीनामा दिलेले राेहन खंवटे यांनी फडणवीसांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी उपस्थितीतांसमाेर बाेलताना फडणवीस यांनी तृणमुल कॉंग्रेस (trinamool congress), आम आदमी पार्टी (aap) आणि काॅंग्रेसचा (congress) समाचार घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमाेद सावंत (pramod sawant) यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

devendra fadnavis
Stephen Curry : एनबीए त 3 पॉइंटर्सचा विक्रम स्थापित (पहा Video)

फडणवीस यांनी आपल्या भाषणात ज्यांच्याकडे स्वतःच्या राज्यासाठी काेणताही निश्चित कार्यक्रम नाही ते गाेवा राज्यात काय करणार. हे पक्ष निवडणुक आली की येथे येतात आणि आपआपल्या पक्षाचा एक्सप्रिमेंट करतात आणि जनतेने नाकारले की पुन्हा मार्गस्थ हाेतात. पश्चिम बंगाल येथे लाेकशाही अस्तित्वात नाही. तेथे दडपशाही, दहशतीचे राज्य आहे. तृणमुल कॉंग्रेस गाेव्यात येऊन लाेकशाहीची शिकवण देत आहे याचे आश्चचर्य वाटते. गाेव्यातील एमजी सारखा पक्ष त्यांच्या समवेत चाललेत म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी असा टाेला फडणवीसांना हाणला. आम आदमी पार्टी म्हणजे केवळ चित्रपटातील ट्रेलर सारखा असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.

देश पुढे न्यायचा असेल गाेवा पुढे न्यायचा असेल तर भाजपाच हवा असा विश्वास राेहन खंवटे यांना असल्यानेच ते भाजपात आले आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक स्वर्थासाठी आलेले नाहीत तर गाेवेकर जनतेसाठी आलेत असेही फडणवीस यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com