Uttar Pradesh News: गावात कोणी पोरगी देईना, सुखी संसारही झाले उद्ध्वस्त; माशांच्या त्रासाने गाव मेटाकुटीला

अनेक विवाहीत स्त्रिया माहेरी निघून गेल्या असून परत सासरी येण्यास तयार नाहीत.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh NewsSaam TV

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातून एक अचंबित करणारी घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील काही गावांमध्ये माशांच्या त्रासाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या गावांमध्ये इतक्या माश्या आहेत की, नागरिकांना झोपताना, खाताना सतत माशांचा त्रास सहन करावा लागत आहे. माशांचा त्रास प्रत्येकालाच होतो, त्यासाठी कुणी घटस्फोट घेत नाही. मात्र या गावात माशांमुळे काहींचे घटस्फोट देखील झाले आहेत. विश्वास न बसणारी ही घटना असली तरी हे सत्य आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

या गावांमध्ये ( Village )जास्त प्रमाणात माशा आहेत. त्यामुळे अनेक विवाहीत स्त्रिया माहेरी निघून गेल्या असून परत सासरी येण्यास तयार नाहीत. माशांच्या त्रासाने कोणीही आपली मुलगी या गावात देण्यास तयार नाही. यामुळे गावातील अनेक तरुणांची लग्न रखडली आहेत. गावात असलेल्या या समस्येसाठी नागरिकांनी अनेकवेळा आंदोलन केली आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाकडे उपाय काढण्याची विनंती केली आहे. मात्र स्थानिक प्रशासन नेहमीच या समस्येकडे दुर्लक्ष करत आले आहे. यात प्रदूषण विभागाची जबाबदारी आहे असे सांगत गावकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

Uttar Pradesh News
Uttar Pradesh News: चालत्या बसमध्ये वाहनचालकाला हृदयविकाचा झटका; रिक्षा, दुचाकी चिरडल्याने २ ठार तर ६ जण जखमी

पोल्ट्रीमुळे माशांचा हल्लाबोल

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिरोरीचील कुईया या गावात साल २०१४ साली मोठी पोल्ट्री खोलण्यात आली. केंद्र सरकारच्या वित्त पोषित कुक्कुट योजनेअंतर्गत पोल्ट्री खोलण्यात आली आहे. या पोल्ट्रीमध्ये दररोज दीड लाख कोंबड्या (Chicken) अंडी देतात. रोजच्या उत्पादनाच्या क्षमतेने गावात जास्त प्रमाणात माशा आहेत. तसेच हे उत्पादन जसजसे वाढेल तसतसे माशांची संख्या देखील वाढत आहे.

Uttar Pradesh News
Breaking News Uttar Pradesh : लुडोच्या खेळात महिलेनं स्वतःला लावलं पणाला, पाहा सविस्तर बातमी

पोल्ट्री मालकाने सांगितले घटस्फोटाचे दुसरे कारण

दलवीर सिंग हे पोल्ट्री फार्मचे मालक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोल्ट्री बांधताना प्रदूषण विभागाची परवानगी घेत गावापासून दूर बांधकाम केले होते. आम्हला एनओसी मिळाली होती. एनओसी नुसार आम्ही गावात राहत्या वस्तीपासून भरपूर दूर अंतरावर पोल्ट्री बांधली. मात्र यानंतर काही गावकऱ्यांनी पोल्ट्रीजवळ घरे बांधली. त्यामुळे त्यांना माशांचा त्रास होत आहे. मात्र आम्ही माशांना रोखण्यासाठी वेळोवेळी औषध फवारणी करत आहोत. असे सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी घटस्फोट होण्याचे आरोप देखील योग्य नसल्याचे म्हटले आहे. यासाठी आणखीन काही कौटुंबिक वाद असावेत असे त्यांना वाटते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com