डॉक्टरांचा चमत्कार, ७ वर्षांपासून बोलता येत नव्हते; शस्त्रक्रियेतून परत दिला आवाज

लहाणपणी दुखापत झाल्यामुळे त्या मुलाला श्वसनाना त्रास होता. यामुळे त्याचा आवाजही येत नव्हता.
Delhi Doctor
Delhi Doctor Saam Tv

नवी दिल्ली: दिल्लीतील (Delhi) सर गंगाराम रुग्णालयातून एक मोठी आणि आनंदाची घटना समोर आली आहे. १० वर्षांपासून एका मुलाला बोलता येत नव्हते. तो मुलगा ट्रॅकोस्टोमी ट्यूबद्वारे श्वास घेत होता. लहानपणी डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्या मुलाला बरीच वर्षे व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दुखापतीमुळे श्वासोच्छवासाची नळीही काम करत नव्हती, त्यामुळे ट्रॅकोस्टोमी ट्यूबद्वारे श्वास घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या मुलावर आज दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात (Hospital) उपचार केले आहेत, यातून त्या मुलाला आता बोलता येत आहे.

या मुलाचे नाव श्रीकांत आहे. श्रीकांतला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे त्याचा आवाजही येत नव्हता. पण तब्बल १० वर्षानंतर या मुलावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया (Operation) करण्यात आली. श्वासनलिका आणि आवाजावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी श्रीकांतला त्याचा श्वास आणि आवाज दोन्ही परत मिळवून दिले, आता श्रीकांतला व्यवस्थित बोलता आणि श्वास घेता येतो.

Delhi Doctor
महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजारांच्या पुढे; चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही?

हे ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी (Doctor) आनंद व्यक्त केला आहे. या रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टर बोलताना म्हणाले, मी माझ्या १५ वर्षाच्या कार्यकाळात यासारखी केस पाहिलेली नाही. पहिल्यांदाच अशी केस पाहत आहे. मला वाटले होते ही खूप गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल. मुलाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयाने थोरॅसिक सर्जरी, ईएनटी, पेडियाट्रिक इंटेसिव्ह केअर आणि ऍनेस्थेशिया या विभागातील डॉक्टरांचे एक विशेष पॅनेल तयार केले आहे.

Delhi Doctor
यूपीच्या हापूर कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 20 जण होरपळले

सर्जरी पूर्वी आई, वडिलांची घेतली परवानगी

या मुलाची श्वसनलिका पूर्णपणे ब्लॉक झाली होती. त्यामुळे ही सर्जरी करणे खूप अवघड झाले होते, पण आमच्यापुढे सर्जरी करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. या सर्जरीमध्ये मोठी जोखीम होती. त्यामुळे संपूर्ण कल्पना आम्ही मुलाच्या पालकांना दिली होती. पालकांनी सर्जरी करण्यासाठी परवानगी दिल्यानंतरच आम्ही सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ही सर्जरी सहा तास चालली. ही सर्जरी यशस्वी झाली. आपल्या मुलाचा आवाज परत आल्यामुळे त्या मुलाचे आई, वडिल खूप खुष झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com