Donald Trump : ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा एंट्री! 22 महिन्यांनंतर अकाऊंट सुरू

काही सेकंदात त्यांचे फॉलोअर्स 8 लाखांहून अधिक झाले.
Donald Trump
Donald TrumpSaam Tv

Donald Trump News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची 22 महिन्यांनंतर ट्विटरवर वापसी झाली आहे. कंपनीने ट्रम्प यांचे खाते पुन्हा सक्रिय केले आहे. म्हणजेच ते आता त्यांचे ट्विटर अकाउंट पूर्वीप्रमाणेच वापरू शकणार आहेत. ट्रम्प यांचे खाते पूर्ववत होताच त्यांचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत. जेव्हा त्यांचे खात रिस्टोअर केले गेले तेव्हा ट्रम्प यांचे 2.3 लाख फॉलोअर्स होते. मात्र काही सेकंदात त्यांचे फॉलोअर्स 8 लाखांहून अधिक झाले.

Donald Trump
Crime News : धक्कादायक! बापानेच चिरला ५ वर्षाच्या मुलाची गळा अन् मग...

मात्र एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरचे नवे मालक झाल्यापासून ट्विटरमध्ये अनेक नवे बदल होताना दिसत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवरील अकाऊंट रिस्टोअर करण्यात येणार की नाही? याबद्दल चर्चा होती. यानंतर मस्कने देखील एक सर्वेक्षण सुरू केले होते आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते रिस्टोअर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेतील कॅपिटल हिल येथे झालेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प यांचे अकाउंट बॅन करण्यात आले होते. त्यांचे शेवटचे ट्विट 8 जानेवारी 2021 रोजी होते. ट्विटरवर ट्रम्प यांचे अकाऊंट बॅन करण्यात आल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये स्वतःचे सोशल मीडीया प्लॅटफॉर्म सुरू केले. ट्रुथ सोशल असे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे नाव आहे. ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांचे सुमारे 45.7 फॉलोअर्स आहेत. ट्रुथ सोशलवर ट्रम्प सतत सक्रिय असतात. ले.

अमेरिकेच्या निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटल हिलमध्ये दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर ट्विटरने जानेवारी 2021 मध्ये ट्रम्प यांचे खाते निलंबित केले होते. आता, मस्क यांच्याकडून हे अकाऊंट सक्रिय करण्यासाठी मतदान सुरू करण्याच्या आधीच सुमारे 14.8 दशलक्ष ट्विटर यूजर्सनी म्हणजेच 51.8% ने ट्रम्पचे खाते पुन्हा सक्रिय करण्याच्या बाजूने मतदान केले होते. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com