इंजिनीअरनं तगड्या पगाराची नोकरी सोडली, गाढविणीचं दूध विकून पैशांचा पाडतोय पाऊस

गाढविणीचं दूध विकून तुम्ही अगदी कमी कालावधीत पैशांचा पाऊस पाडू शकता.
Donkey Milk Farming
Donkey Milk FarmingSaam Tv

Donkey Milk Farming: गाढव म्हटलं की फक्त ओझे वाहून नेणारा प्राणी असं चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. पण गाढव तुम्हाला कोट्यधीश करू शकतो असं कुणी सांगितलं तर?... विश्वास बसणार नाही, पण गाढवामुळं खरंच कोट्यधीश होऊ शकता. गाढविणीचं दूध (Milk) विकून तुम्ही अगदी कमी कालावधीत पैशांचा पाऊस पाडू शकता.

गाढविणीच्या दूधाला भारतातही आता मागणी वाढलेली आहे. हे दूध ५० रुपये लिटर किंवा १०० रुपये लिटर विकले जात नाही, तर तब्बल प्रतिलिटर पाच हजार रुपयांना विकले जाते.

Donkey Milk Farming
काँग्रेसच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले....

कर्नाटकच्या श्रीनिवास गौडाने सॉफ्टवेअर इंजिनीअरची नोकरी सोडली आणि गाढविणीच्या दूधाची डेअरी सुरू केली. गाढविणीच्या दूधाला खूप मागणी असल्याचे श्रीनिवासचे म्हणणे आहे. त्याच्याकडे आतापर्यंत १७ लाख रुपयांच्या दूधाची ऑर्डर आलेली आहे. गाढविणीचं दूध पाकीटबंद करून ते विकणार आहे. ३० मिलीलीटर दूधाच्या (Milk) पाकिटाची किंमत १५० रुपये आहे. मॉल, दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये हे गाढविणीच्या दूधाची पाकीटं पुरवण्यात येणार आहेत.

Donkey Milk Farming
केतकी चितळेला 'या' प्रकरणात जामीन, पोलीस महासंचालकांना महिला आयोगाची नोटीस

ही आयडीया कुठून आली?

मनी कंट्रोल डॉट कॉमच्या एका वृत्तानुसार, श्रीनिवास गौडा कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील इरा गावात राहतो. २०२० पर्यंत त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम केले. त्यानंतर तो पुन्हा मूळ गावी परतला. त्याने गावातच २.३ एकर परिसरात ससा आणि कडकनाथ कोंबडीचा ब्रिडिंग फार्म सुरू केला. त्यानंतर गाढवाच्या काही प्रजातींची संख्या घटल्याने त्याला डॉन्की मिल्क फार्मिंग करण्याचा विचार मनात आला, असे त्याचे म्हणणे आहे.

जेव्हा त्याने ही कल्पना आपल्या जवळच्या काही लोकांना सांगितली त्यावेळी त्यांना डॉन्की मिल्क फार्मिंगची ही कल्पना काही आवडली नाही. पण त्याने कुठलीच पर्वा केली नाही. सुरुवातीला २० गाढविणी घेऊन व्यवसाय सुरू केला. गाढविणीचं दूध चविष्ट असतं. त्यात आरोग्याला पोषक असे गुणकारी घटक आहेत. त्यामुळे या दूधाला खूपच मागणी आहे. तसेच किंमतही खूप आहे. गाढविणीचे दूध पाकीटबंद करून विकणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ३० मिलीलीटर दूधाची किंमत दीडशे रुपये आहे. आतापर्यंत १७ लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. दुकाने, मॉल आणि सुपर मार्केटमध्ये पाकीटबंद दूध पाठवण्यात येणार आहे, अशीही माहिती त्याने दिली. (Donkey Milk Farming)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com