घराबाहेर पडू नका- दिल्लीकरांना IMDचा इशारा; पारा जाणार 45 अंशाच्या पुढे!

दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेची (Heat Wave) लाट कायम आहे. हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला असून सध्या तरी यातून दिलासा मिळण्याची आशा नसल्याचे म्हटले आहे.
Delhi Weather
Delhi WeatherSaam Tv

दिल्ली एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात उष्णतेची (Heat Wave) लाट कायम आहे. हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला असून सध्या तरी यातून दिलासा मिळण्याची आशा नसल्याचे म्हटले आहे. IMD ने येल्लो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. त्यात सांगण्यात आले आहे की, पारा 45 अंश ओलांडू शकतो, त्यामुळे शक्य तितके घरातच रहा.

पाकिस्तानमधून (Pakistan) वाहणाऱ्या कोरड्या आणि उष्ण पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे, उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, साधारणतः 11 आणि 12 जून रोजी लोकांना कडक उन्हापासून दिलासा मिळू शकतो. त्यानंतर हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाची शक्यता आहे.

Delhi Weather
'नेहमी मलाच खर्रा का मागतो...?' वादातुन मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला

दिल्लीत 47 अंश तापमानाची नोंद;

देशाची राजधानी दिल्लीत उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही आहे तसेच सोमवारी अनेक भागात पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर राहणार आहे. ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbances) आठवड्याच्या शेवटी या उष्णतेपासून (Heat) काहीसा दिलासा मिळू शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या ठिकाणी येत्या 24 तासांत पाऊस पडणार;

पुढील 24 तासांत, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, केरळ, दक्षिण कर्नाटक आणि किनारी आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहारचा पूर्व भाग, तामिळनाडू, रायलसीमा, केरळ, दक्षिण कोकण आणि गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. याशिवाय अंतर्गत ओडिशा, मराठवाडा आणि जम्मू-काश्मीरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com