क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या चुका; अन्यथा होईल नुकसान...

जेव्हा बँकेत खाते उघडले जाते तेव्हा बँकेकडून ग्राहकांना अनेक सुविधा आणि ऑफर दिल्या जातात. उदाहरणार्थ, बँक ग्राहकांना दोन प्रकारची कार्ड्स देते, एक म्हणजे डेबिट आणि दुसरे क्रेडिट कार्ड.
How to avoid credit card fraud, Credit card tips in Marathi
How to avoid credit card fraud, Credit card tips in MarathiSaam Tv

Credit Card Tips: जेव्हा बँकेत खाते उघडले जाते तेव्हा बँकेकडून ग्राहकांना अनेक सुविधा आणि ऑफर दिल्या जातात. उदाहरणार्थ, बँक ग्राहकांना दोन प्रकारची कार्ड्स देते, एक म्हणजे डेबिट आणि दुसरे क्रेडिट कार्ड. ग्राहकांकडून वेळोवेळी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर होत असतो. दुसरीकडे, ग्राहकाला जेव्हा जास्त पैशांची गरज असली की ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करतो. परंतु अनेकदा क्रेडिट कार्ड वापरताना व्यक्ती विसरतो की हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि याचा परतावा नंतर बँकेत करावा लागणार आहे. (How to avoid credit card fraud)

तसे, क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. वेळोवेळी, जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा क्रेडिट कार्ड खूप मदत करते. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डवर अशा अनेक सवलती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत, पण कार्ड वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच क्रेडिट कार्डचा वापर जपून केला पाहिजे, कारण क्रेडिट कार्ड वापरताना थोडी निष्काळजीपणा तुम्हाला अडचणीत टाकू शकते. टाकू शकते चला तर मग जाणून घेऊया क्रेडिट कार्ड वापरताना कोणत्या चुका टाळाव्यात.

How to avoid credit card fraud, Credit card tips in Marathi
Photos: क्युट नाही बोल्डनेसने भरलंय रश्मीकाचे नवीन फोटोशूट!

एटीएममधून पैसे काढताना:

एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डचाही वापर केला जाऊ शकतो, हे तुम्हाला माहित असेलच. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पैसे वापरता, तेव्हा बँक तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एक महिना देते. पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे एटीएममधून पैसे काढता, तेव्हापासूनच बँक व्याज आकारण्यास सुरुवात करते. यावर 2.5 टक्क्यांपासून ते 3.5 टक्क्यांपर्यंतचा व्याजदर असू शकतो आणि तुम्हाला फ्लॅट ट्रान्झॅक्शन टॅक्सही भरावा लागेल.

हे देखील पहा-

क्रेडिट मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त खर्च करणे:

बरेचदा लोक क्रेडिट कार्ड मिळताच ते लगेच खर्च करू लागतात आणि क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च करण्यासाठी, बँक शुल्क आकारते आणि तुमचा CIBIL स्कोर देखील चुकीच्या पद्धतीने प्रभावित होतो. त्यामुळे अनेकदा क्रेडिट कार्ड वापरताना मर्यादा लक्षात ठेवा.

बॅलन्स ट्रान्स्फर सुविधा:

क्रेडिट कार्ड तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील देते. यामध्ये तुम्ही एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवर पैसे पाठवू शकता. या सुविधेवर तुम्हाला व्याजही भरावे लागेल. लक्षात ठेवा की ही सुविधा तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची असेल तेव्हाच वापरा, कारण असे वारंवार केल्याने तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com