IAS बनायला आलेल्या तरुणाचा कारनामा; पालक, पोलिसांच्या पाया खालची जमीन सरकली

त्याच्यावर बरेच कर्ज झाले होते, ते फेडण्यासाठी खूप दबाव होता.
IAS बनायला आलेल्या तरुणाचा कारनामा; पालक, पोलिसांच्या पाया खालची जमीन सरकली
IAS बनायला आलेल्या तरुणाचा कारनामा; पालक, पोलिसांच्या पाया खालची जमीन सरकलीSaam TV

नवी दिल्ली: बिहारमधील चंपारण येथील रहिवासी असलेल्या पालकांना त्यांच्या मुलाने आयएएस (IAS) व्हावे अशी इच्छा होती. त्यासाठी त्यांनी नागरी सेवा परीक्षेच्या (UPSC) तयारीसाठी त्याला दिल्लीला पाठवले. शिक्षणापासून सर्व प्रकारचा खर्च आई-वडील करत होते. पण, अभ्यासाच्या नावाखाली मुलाने असे कृत्य केले की, पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. तर झालं असं ऑनलाइन सट्टेबाजीमुळे विद्यार्थ्यावर कर्ज झाले म्हणून त्याने नातेवाईकांकडून पैसे वसुलीचा कट रचला. स्वत:च्याच अपहरणाचे नाटक रचून नातेवाईकांकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली. नातेवाइकांना आपलं नाटक खरं वाटावं म्हणून त्याने व्हॉट्सअॅपवर रडतानाचा एक व्हिडिओही पाठवला, मात्र ही तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर संपूर्ण नाट्य उघड झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी रोजी बिहारमधील चंपारण येथील रहिवासी मुहम्मद अजीझुल हक आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी सांगितले की त्यांचा 20 वर्षांचा मुलगा मेहताब हाश्मी तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. तो दिल्लीतील राजेंद्र नगर येथील एका कोचिंग सेंटरमध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असून वजिराबाद भागात राहतो.

IAS बनायला आलेल्या तरुणाचा कारनामा; पालक, पोलिसांच्या पाया खालची जमीन सरकली
IPL 2022: BCCI ची युएई नाही तर 'या' दोन देशांना स्पर्धा घेण्यास पसंती

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी आपल्या मुलाला दोनदा पाच लाख रुपये अभ्यासासाठी पाठवले होते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या वजिराबाद येथील मुलाच्या घराचा आणि कोचिंग सेंटरचा पत्ता नाही. त्यांनी पोलिसांना सांगितले की, 6 जानेवारी रोजी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवरून पत्नीच्या मोबाईलवर रेकॉर्डिंगचा मेसेज आला. मेहताबचे अपहरण करण्यात आले असून त्याच्या सुटकेसाठी 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वाटाघाटीनंतर अपहरणकर्त्यांनी 10 लाख रुपयांमध्ये मेहताबला सोडण्यास तयार झाले. त्यांनी एक व्हिडिओ क्लिपही पाठवण्यात आली होती ज्यामध्ये त्यांचा मुलगा रडत होता.

या प्रकरणी मध्य जिल्ह्यातील राजेंद्र नगर पोलिस ठाण्यात 9 जानेवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने फोन ट्राकिंगची मदत घेतली असता मेहताबचा मोबाईल वजिराबाद परिसरात सक्रिय असल्याची माहिती मिळाली. त्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्याला पकडले.

व्हिडिओ आईला पाठवला

मेहताबने पोलिसांना सांगितले की, तो ऑनलाइन सट्टा खेळतो ज्यामध्ये त्याला खूप त्रास सहन करावा लागला होता. त्याच्यावर बरेच कर्ज झाले होते, ते फेडण्यासाठी खूप दबाव होता. त्यामुळेच तो अपहरणाचा बहाणा करून नातेवाइकांकडून खंडणीचा प्रयत्न करत होता. यासाठी त्याने आपल्या आईला अपहरणाची खात्री पटवण्यासाठी त्याच्या रडण्याचा व्हिडिओही व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.