जेलमध्ये ड्रग्स पार्टी, महिला कैद्यांवर बलात्कार, पुरवल्या जायच्या कॉल गर्ल

ड्रग माफिया हा सेक्स अॅडिक्ट होता आणि त्याने एकदा आपल्या पार्टनरसोबत पैज लावली की कोण किती दिवस सेक्स करू शकतो.
जेलमध्ये ड्रग्स पार्टी, महिला कैद्यांवर बलात्कार, पुरवल्या जायच्या कॉल गर्ल
जेलमध्ये ड्रग्स पार्टी, महिला कैद्यांवर बलात्कार, पुरवल्या जायच्या कॉल गर्लSaam TV

मेक्सिको: कुख्यात मेक्सिकन ड्रग माफिया एल चापो एकेकाळी किती ताकदवान होता, यावरून त्याचे सर्व छंद तुरुंगातही पूर्ण झाले होते, याचा अंदाज येतो. ड्रग्स लॉर्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या अल चापोच्या नवीन पुस्तकात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या माफियाला वेगवेगळ्या मुलींशी संबंध ठेवण्याची सवय होती आणि तुरुंगातही हा छंद पूर्ण होत असे, असे या पुस्तकात सांगण्यात आले आहे.

अनेक कैद्यांवर केला बलात्कार

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, कारागृहात एल चापोला (EL Chapo) सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. तो सेलमध्येच व्हायग्रासारखे लैंगिक शक्ती वाढवणारे औषध घेत असे. एवढेच नाही तर कारागृहात असताना त्याने काही महिला कैद्यांवर बलात्कारही केला होता. पुस्तकात सांगितले आहे की ड्रग माफिया हा सेक्स अॅडिक्ट होता आणि त्याने एकदा आपल्या पार्टनरसोबत पैज लावली की कोण किती दिवस सेक्स करू शकतो.

जेलमध्ये ड्रग्स पार्टी, महिला कैद्यांवर बलात्कार, पुरवल्या जायच्या कॉल गर्ल
बहिणीला दारु पिऊन त्रास देतो म्हणून मेहूण्याने काढला दाजीचा काटा

रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करत असे

पत्रकार अॅनाबेल हर्नांडेझने तिच्या 'Emma and the Other Narco Women' या पुस्तकात लिहिले आहे की, एल चापो त्याच्या सेलमधील रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करत असे. पुस्तकानुसार, मेक्सिकोच्या पुएन्ते ग्रांदे तुरुंगात असताना ड्रग माफियाने त्याचे सर्व छंद पूर्ण केले. ड्रग्ज आणि सेक्सपासून ते स्वादिष्ट जेवणापर्यंत सर्व काही त्याला पुरवले गेले. त्याच्यासाठी वेश्या बोलावण्यात आल्या आणि हे शक्य नसताना तुरुंगात काम करणाऱ्या परिचारिका, सफाई कामगार आणि स्वयंपाक करणाऱ्या महिलांना त्याच्याकडे पाठवण्यात आले. त्यासाठी त्यांना पैसेही देण्यात आले.

नकार दिल्याने महिलेला मारहाण

पुस्तकात एका घटनेचे वर्णन केले आहे जेव्हा एका महिला कैद्याने एल चापोची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला होता, ड्रग माफियाने क्रूरपणे तिची हत्या केली होती. नंतर तिच्यावर बलात्कार केला. एल चापोचे खरे नाव जोआकिन आर्किवाल्डो गुझमन लोएरा आहे. कॅथोलिक बिशपच्या हत्येप्रकरणी त्याला 1993 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते, परंतु काही वर्षांनंतर तो पळून गेला. नंतर तो पुन्हा पकडला गेला आणि आता तो अमेरिकेतील उच्च सुरक्षा तुरुंग, कोलोरॅडोमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.