Viral News : घर, रस्ता नाहीतर थेट कारच्या टपावर थाटलं दुकान; जुगाडू दुकानदार सोशल मीडियावर व्हायरल

एका व्यक्तीने चक्क त्याच्या चारचाकी कारमध्ये दुकान उघडले आहे.
Viral News
Viral NewsSaam TV

Viral News: प्रत्येक व्यक्ती आपल्या समस्यांवर उपाय शोधत असतो. अशात भारतात असे अनेक जण आहेत जे उपाय म्हणण्यापेक्षा त्या समस्येचा जुगाड शोधतात असे म्हटल्यास वावगं ठरणारं नाही. कारण सोशल मीडियावर एका जुगाडू दुकानाचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

आजवर तुम्ही मॉलमध्ये, रस्त्यावर स्टेशन परिसरात विविध दुकाने पाहिली असतील. अनेक जण जागेच्या कमतरतेने घरात किंवा घरातील खिडकीत देखील दुकान उघडतात. मात्र एका व्यक्तीने चक्क त्याच्या चारचाकी कारमध्ये दुकान उघडले आहे.

Viral News
Navi Mumbai : नवी मुंबईतही 'उत्तर प्रदेश पॅटर्न', पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

त्याचं हे अनोखं दुकान (Shop) पाहून सगळेच चकीत झाले आहेत. प्रत्येक विक्रेता आपल्या कौशल्याने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. आपणही असेच काही हटके करावे म्हणून उत्तरप्रदेशच्या लखनऊमध्ये एका व्यक्तीने त्याच्या मारूती ८०० या कारचे छत कापून तिथे स्वत:चे दुकान थाटले आहे. त्याच्या दुकानात पान, सिगारेट, तंबाखू, बिस्कीट, वेफर्स अशा वस्तू तो विकतो. काहीतरी हटके केल्याने या दुकानाबाहेर ग्राहकांची नेहमी गर्दी दिसते.

जुगाडू दुकानाचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आयपीएस (IPS) अधिकारी पंकज नैन यांनी हा फोटो ट्वीट केला आहे. तसेच हे दुकान नाविन्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. अशात सोशल मीडियावर यावर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. यात एका युजरने या कमेंटमध्ये म्हटले आहे की, हे तंत्रज्ञान उत्तम आहे. तर दुसऱ्या एकाने याला वाहनांच्या नियामांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com