'हे' विद्यापीठ देणार वेश्याव्यवसायाचे प्रशिक्षण; सेक्स वर्कर होण्याचही शिक्षण
'हे' विद्यापीठ देणार वेश्याव्यवसायाचे शिक्षण; सेक्स वर्कर होण्याचही शिक्षण

'हे' विद्यापीठ देणार वेश्याव्यवसायाचे प्रशिक्षण; सेक्स वर्कर होण्याचही शिक्षण

या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा व्यवसाय कायदेशीर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

वेश्याव्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी इंग्लंडच्या डरहम विद्यापीठाने प्रशिक्षण सुरू केले आहे. विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांनी वेश्या म्हणून काम करताना सुरक्षित कसे राहावे याबद्दल ऑनलाइन अभ्यासक्रम देते. यासंदर्भात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व माहिती विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. यावर ब्रिटनच्या उच्च शिक्षण राज्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा व्यवसाय कायदेशीर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

'हे' विद्यापीठ देणार वेश्याव्यवसायाचे शिक्षण; सेक्स वर्कर होण्याचही शिक्षण
श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मजुरीची वेळ

इंग्लंडमधील प्रतिष्ठित डरहम विद्यापीठ वेश्याव्यवसायासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने वेश्याव्यवसायात गुंतलेल्या किंवा बाहेरील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित राहण्यासाठी एक विशेष अभ्यासक्रम सुरु करण्याच्या तयारीत आहे. विद्यार्थी संघटनेने सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना जाहिरातीद्वारे ई-मेल पाठवला आहे. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, डरहम स्टुडंट युनियनने स्वतःच वेश्याव्यवसायासाठी ऑनलाइन कोर्स तयार केला आहे. वेश्याव्यवसाय उद्योगाशी संबंधित कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी हा कोर्स खास तयार करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, या प्रशिक्षणाचा उद्देश यात सहभागी असलेल्या लोकांना सुरक्षित ठेवण्याचा आहे.

दुसरीकडे या विचित्र अभ्यासक्रमाबाबत विरोधही सुरू झाला आहे. उच्च शिक्षण राज्यमंत्री मिशेल डोनेलन यांनी विद्यापीठावर "धोकादायक उद्योग कायदेशीर करणे" आणि "विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी कर्तव्याचे घोर उल्लंघन" अशी टीका केली आहे. "असे करणारे प्रत्येक विद्यापीठ यात अपयशी ठरत आहे" असे राज्यमंत्री म्हणाले. मंत्री पुढे म्हणाले, “वेश्याव्यवसायात शोषित महिलांना पाठिंबा मिळणे योग्य आहे. परंतु हा अभ्यासक्रम वेश्याव्यवसायाची विक्री सामान्य करण्याचा प्रयत्न करेल, त्याला विद्यापीठांमध्ये स्थान नाही. ” डरहम विद्यापीठ आणि विद्यार्थी संघटनेकडे विद्यार्थ्यांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. हा अभ्यासक्रम सुरू केल्याने काही विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कॅम्पसमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची भावना निर्माण होईल, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com