Dust Storm Pakistan: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत! सावध राहण्याचा इशारा

मागील काही दिवसांपासून निसर्गाने थंडी, पावसाची बरसात सुरु केली आहे.
Dust Storm Pakistan: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत! सावध राहण्याचा इशारा
Dust Storm Pakistan: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत! सावध राहण्याचा इशाराSaam Tv

मुंबई: मागील काही दिवसांपासून निसर्गाने (nature) थंडी, पावसाची (rain) बरसात सुरु केली आहे. मागील महिनाभरापासून महाराष्ट्राबरोबर (Maharashtra) देशभरामध्ये कुठे दाट धुके, कुठे अवकाळी पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी पडत आहे. आज तर पाकिस्तानातून (Pakistan) सुटलेले वादळ (Storm) महाराष्ट्रावर धडकले आहे. (Dust storm from Pakistan in Mumbai)

हे देखील पहा-

पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे (Dust) वादळ गुजरात (Gujarat), अरबी समुद्रमार्गे (Arabian Sea) महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यामुळे कोकणामध्ये (Konkan) पाऊस तर मुंबई, पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात आज थंड वारे सुरु झाले आहेत. यामुळे उ. कोकण आणि म. महाराष्ट्रात दृष्यमानता कमी झाली आहे. मुंबई (Mumbai)- पुण्यामध्ये धुलीकणांचे प्रमाण देखील वाढल्याची नोंद करण्यात आली आहे.

Dust Storm Pakistan: पाकिस्तानातील धुळीचं वादळ मुंबईत! सावध राहण्याचा इशारा
Balasaheb Thackeray: आदित्य ठाकरेंकडून बालपणीच्या आठवणींना उजाळा

यामुळे वाहन चालविताना चालकांनी तसेच श्वसनाचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. हे धुळीचे वादळ असल्यामुळे पाकिस्तानातून आलेले धुलीकण हवेत पसरले आहेत. यामुळे समोरचे दिसणे कमी झाले आहे. शिवाय अधून- मधून ढग देखील ये- जा करत आहेत. यामुळे सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणावर जमिनीवर पडत नाही. यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.