Devendra Fadnavis : ठाकरे गटाच्या 'त्या' टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'मी पुराव्याशिवाय...'

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
BJP Vs thackeray group
BJP Vs thackeray group Saam TV

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचा गौफ्यस्फोट केला होता. त्या गौफ्यस्पोटावरून संजय राऊत म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंद जडला, अशी टीका केली होती. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सनसनाटी निर्माण करण्यासाठी विधान करत नाही. मुख्यमंत्रिपदाची मला ॲाफर दिली होती, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही.आपल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी निवडणूकीची विधानं करावी लागतात'.

BJP Vs thackeray group
Mumbai News : कोलशेवाडी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत केली कारवाईची मागणी

दरम्यान, ब्राह्मण समाजावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'ब्राह्मण समाज देशात संख्येने कमी असतील. मात्र, समाजात ब्राह्मण समाज साखरेचं काम करतो. वेळेनुसार बदलावं लागतं. २१ व्या शतकातील मुल्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. मला आपल्या समाजातील ब्राह्मण तरूण निराश दिसतात. पण त्यांनी दृष्टीकोन बदलायला हवा.आपला दृष्टीकोन आणि विचार बदलायला हवेत. २१ व्या शतकातील नवीन संधी शोधायला हव्या'.

BJP Vs thackeray group
Nawazuddin Siddiqui: नवाजने घेतली राज ठाकरेंची भेट; शिवतिर्थावर घेतलेल्या भेटीमागचं कारण काय? चर्चांना उधाण

'कोरोना (Corona) काळानंतरच्या जगात भारताला मोठी संधी आहे. चीनने २५ वर्षात सप्लाय चीन तयार केली. मात्र, कोरोना काळात ही बंद पडली. त्याने जगभराच्या उद्योगात मंदी झाली. त्यामुळे आता जगभरातील देश आता चायना प्लस वन पॉलिसी आणू इच्छित आहेत. अनेक उद्योगपती चीनमधून बाहेर पडत आहे. येणारा काळात भारत हा वर्ल्ड फॅक्टरी होईल. भारत वर्ल्ड फॅक्टरी होईल. मात्र, तो प्रदुषणविरहीत असेल. भारतात ग्रीन उर्जाचा वापर वाढला आहे, असे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com