Walmart Layoffs: बाबांनो नोकऱ्या सांभाळा! आता ही कंपनी 2000 कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याच्या तयारीत

Walmart Layoffs News: नवीन आर्थिक वर्ष सुरु होत नाही तोवरच दिग्गज रिटेल कंपनी वॉलमार्कने (Walmark Company) मोठ्या कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.
Walmart Layoffs
Walmart LayoffsSaam Tv

Walmart Company: संपूर्ण जगावर सध्या मंदीचे सावट आहे. अनेक दिग्गज कंपन्या एकापाठोपाठ कर्मचारी कपातीचा (Lay off) निर्णय घेत आहे. कर्मचारी कपातीचे हे सत्र गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरु होत नाही तोवरच दिग्गज रिटेल कंपनी वॉलमार्कने (Walmark Company) मोठ्या कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

Walmart Layoffs
Petrol Diesel News : महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका, पेट्रोल-डिझेल महागणार?

रिटेल कंपनी वॉलमार्ट कर्मचारी कपात करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. पण किती कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरुन काढून टाकणार याची माहिती समोर आली नव्हती. अखेर कंपनीने किती कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार हे जाहीर केले. मिळालेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट इंक (walmart inc) लवकरच अमेरिकेतील 5 ई-कॉमर्स वेअरहाऊसमधील 2000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे.

Walmart Layoffs
China vs India : भारताविरोधात चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, या कर्मचारी कपातीमध्ये फोर्ट वर्थ, टेक्सास, पेनसिल्व्हेनिया, फ्लोरिडा आणि न्यू जर्सी येथील वेअर हाऊसेसचा समावेश आहे. याठिकाणी वेगवेगळ्या स्तरांवर किती कर्मचाऱ्यांची कपात करायची याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे.

इतक्या प्रमाणात होणार कर्मचारी कपात -

अमेरिकेतील फोर्ट वर्थ आणि टेक्सासमध्ये 1000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाणार आहे. पेनसिल्व्हेनिया फुलफिलमेंट सेंटरमधून 600 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येणार आहे. तर, फ्लोरिडामध्ये 400 आणि न्यू जर्सीमध्ये 200 कर्मचाऱ्यांना घरी पाठण्यात येणार आहे. ऐवढेच नाही तर वॉलमार्ट कंपनी कॅलिफोर्नियामधील कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या तयारीमध्ये आहे.

Walmart Layoffs
Twitter New Logo : ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र... ट्विटरमध्ये सर्वात मोठा बदल, यूजर्सही झाले अचंबित

रॉयटर्सने 23 मार्च रोजीच वॉलमार्टच्या कर्मचारी कपातीबाबतची माहिती दिली होती. रॉयटर्सने रिपोर्टमध्ये सांगितले होते की, ई-कॉमर्स ऑर्डर पूर्ण करणाऱ्या पाच वॉलमार्ट सुविधांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन घरी जाण्यास सांगितले जाऊ शकते. यासोबतच या कर्मचाऱ्यांना ९० दिवसांच्या आत इतर कंपन्यांमध्ये नोकरी शोधण्यास सांगितले जाऊ शकते.

Edited By - Priya Vijay More

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com