इयरफोन लावून PUBG खेळणाऱ्या दोघांना ट्रेनने चिरडले

मथुरा जिल्ह्यामधील जमुना पार पोलिस स्टेशन परिसरामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास इअरफोन लावून, मोबाईलवर PUBG गेम खेळणाऱ्या दोघांचा रेल्वेच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला
इयरफोन लावून PUBG खेळणाऱ्या दोघांना ट्रेनने चिरडले
इयरफोन लावून PUBG खेळणाऱ्या दोघांना ट्रेनने चिरडलेSaam Tv

वृत्तसंस्था : मथुरा जिल्ह्यामधील जमुना पार पोलिस स्टेशन परिसरामध्ये शनिवारी सकाळच्या सुमारास इअरफोन लावून, मोबाईलवर PUBG गेम खेळणाऱ्या दोघांचा रेल्वेच्या धडकेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कासगंज- मथुरा रेल्वे ट्रॅकवर लक्ष्मीनगरजवळच रेल्वेची धडक बसून २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, जमुना पार पोलिस स्टेशनचे प्रभारी शशी प्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार की, लक्ष्मीनगरजवळ कासगंज- मथुरा रेल्वे मार्गावर गौरव(वय- १६) आणि कपिल (वय- १८) यांचे मृतदेह सापडले आहेत. दोघेही जवळच्या कालिंदी कुंज कॉलनी मधील रहिवासी आहेत. पहाटेच्या सुमारास घरातून फिरायला आले होते.

इयरफोन लावून PUBG खेळणाऱ्या दोघांना ट्रेनने चिरडले
आंध्र प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, अनेक रस्ते पाण्याखाली

स्टेशन प्रभारींनी दिलेल्या माहितीनुसार की, दोघांच्या मृतदेहाजवळ त्यांचे मोबाईल सापडले आहेत. त्यात एकजण त्याच्या मोबाईलवर PUBG गेम चालवत होता. कानात इअरफोन टाकून गेम खेळत असल्यामुळे त्यांना ट्रेनचा आवाज आला नसावा, असा अंदाज आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com