Indonesia Earthquake Update : भूकंपाने हादरला इंडोनेशिया; 44 जणांचा मृत्यू, ३०० हून अधिक जण जखमी

भूकंपात जावामध्ये सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला असून किमान 300 लोक जखमी झाले आहेत.
Earthquake in Delhi
Earthquake in Delhi saam tv

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे सोमवारी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. आजच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. हवामान आणि भूभौतिकीय एजन्सीनुसार, आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे जमिनीच्या 10 किमी खोलीवर होता. एएफपीच्या वृत्तानुसार, या भूकंपात जावामध्ये सुमारे 44 लोकांचा मृत्यू झाला असून किमान 300 लोक जखमी झाले आहेत.

Earthquake in Delhi
Mumbai: कोश्यारींचा फोटो लावलेल्या खोक्यांचं समुद्रात विसर्जन; ठाकरे गटाकडून राज्यपालांविरोधात अनोखं आंदोलन

भूकंपामुळे सियांजूर येथील डझनभर इमारतींचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के खूप तीव्र जाणवले. ऑफिस किंवा घरामध्ये असलेल्या लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवताच मोकळ्या जागी पळ काढला. (Latest Marathi News)

इंडोनेशियामध्ये भूकंप वारंवार होतात, परंतु जकार्तामध्ये ते जाणवणे असामान्य आहे. 27 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाला वारंवार भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि सुनामीचा फटका बसतो.

Earthquake in Delhi
Sanjay Gaikwad : ...अन्यथा भाजपसोबतची युती तुटेल; शिंदे गटातील आमदाराचा थेट इशारा

याआधी शुक्रवारी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.07 वाजता भूकंप झाला. त्याची खोली भूगर्भात 20 किमी होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com