Indonesia Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया पुन्हा हादरलं; ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

इंडोनेशिया देश पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे.
Earthquake
Earthquake saam tv

Indonesia Earthquake News : इंडोनेशिया देश पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. आज, शनिवारी इंडोनेशियाच्या पश्चिमच्या जावा भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप झाला आहे. इंडोनेशियात पुन्हा एकदा भूकंप झाल्याने खळबळ उडाली आहे. हा भूकंप केंद्रबिंदू जमिनीपासून 118 किमी खोलीवर होता. इंडोनेशियाच्या भूभौतिकीय एजन्सी BMKG ने ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Earthquake
Delhi News : 8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला, १० मिनिटं निघून गेली अन् मग...

इंडोनेशियात भूकंप (Earthquake) झाल्याने देशातील पश्चिम जावा येथे एकच खळबळ उडाली आहे. तसेच इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इंडोनेशियात झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. इंडोनेशियातील अधिकारी भूकंपाने झालेल्या नुकसानीची माहिती घेत आहेत.

गेल्या महिन्यात भूकंपामुळे झाला होता ३०० जणांचा मृत्यू

दरम्यान, इंडोनेशियाची राजधानी जकार्ता गेल्या महिन्यात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 इतकी होती. हवामान आणि भूभौतिकीय एजन्सीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे जमिनीच्या 10 किमी खोलीवर होता. या भूकंपात जावामध्ये सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली होती.

Earthquake
VIRAL VIDEO:महिलेच्या हट्टापुढे रेल्वे चालकानेही मानली हार; एसी ट्रेन खचाखच भरल्याने इंजीन डब्ब्यातून केला प्रवास

भूकंपामुळे सियांजूर येथील डझनभर इमारतींचे नुकसान झाले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के खूप तीव्र जाणवले. ऑफिस किंवा घरामध्ये असलेल्या लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवताच मोकळ्या जागी पळ काढला होता.

इंडोनेशियामध्ये भूकंप वारंवार होतात, परंतु जकार्तामध्ये ते जाणवणे असामान्य आहे. 27 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियाला वारंवार भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि सुनामीचा फटका बसतो.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com