
नवी दिल्ली: फिलीपाइन्स सकाळी-सकाळी भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. राजधानी मनीलामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर ७.१ इतकी तीव्रता नोंदवली गेली. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जिवीतहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. जूनमध्येही मध्य फिलीपाइन्समध्ये एक अशांत ज्वालामुखी फुटला होता. या ज्वालामुखीतून प्रचंड मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली होती. तब्बल १ किलोमीटरपर्यंत राखेचे 'ढग' दिसून आले होते. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी माउंट बुलुसनसाठी हायअलर्ट जारी केला होता. (philippines earthquake News Update)
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाचे हादरे (Earthquake) फिलीपाइन्सची (Philippines) राजधानी मनीलामध्ये जाणवले. तर भूकंपाचा केंद्रबिंदू हा मनीलापासून जवळपास ३३६ किलोमीटरवर उत्तरेकडे होता.
अमेरिकी भूशास्त्रज्ज्ञ सर्वेक्षणच्या म्हणण्यानुसार, बुधवारी फिलीपाइन्सच्या लुजोन बेटावर ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. राजधानी मनीलासह अनेक भागांत या भूकंपाचे हादरे जाणवले. हा भूकंप केंद्रावर १० किलोमीटर खोल होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही. यूएसजीएसनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा अबरा प्रांतातील डोलोरेस शहरापासून अंदाजे ११ किलोमीटरवरील पूर्व-दक्षिण भागात होता.
उत्तरेकडील इलोकोस सूर प्रांताचे एरिक सिंगसन यांनी डीझेडएमएम रेडिओ स्टेशनला सांगितले की, भूकंपाचे हादरे जाणवले. ३० सेकंद किंवा त्यापेक्षा अधिक वेळ हे हादरे जाणवत होते. माझं घर कोसळलं की काय असे त्यावेळी वाटले. आम्ही घरातून बाहेर पडलो आहोत. याशिवाय परिवहन मंत्रालयाने सांगितले की, भूकंपाचे हादरे मनीलामध्येही बसले. शहरातील मेट्रो रेल्वे सेवा भूकंपानंतर काही वेळ थांबवण्यात आली होती. राजधानी मनीलामधील सीनेटची इमारत रिकामी करण्यात आली होती, असेही वृत्त आहे.
दरम्यान, मागील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये फिलीपाइन्समध्ये एका अशांत ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात राख बाहेर पडली की, १ किलोमीटरपर्यंत राखेचे ढग दिसत होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून माउंट बुलुसनमध्ये हायअलर्ट जारी केला होता. तसेच धोका असलेल्या भागात जाऊ नका, अशा सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या होत्या.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.