Mukhtar Ansari News | यूपीच्या बाहुबली नेत्यावर ईडीची कारवाई; दिल्लीसह अनेक ठिकाणांवर छापे

उत्तर प्रदेशातील बाहुबली नेत्याविरोधात ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे.
ED raids multiple places on Mukhtar Ansari
ED raids multiple places on Mukhtar AnsariSAAM TV

ED Raid On Mukhtar Ansari | नवी दिल्ली/ लखनऊ: उत्तर प्रदेशचे बाहुबली नेते मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली. ईडीने दिल्ली, लखनऊ, गाझीपूर आणि मऊ येथे मुख्तार अन्सारी आणि त्याच्या निकटवर्तीयांशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे मारले.

ED raids multiple places on Mukhtar Ansari
ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या धमक्यांना मविआ भीत नाही; नाना पटोलेंचा हल्लाबोल

इतकेच नाही तर, ईडीने (ED) मुख्तार यांच्या मुहम्मदाबादस्थित घरावरही छापा मारला. याशिवाय टाउन हॉलमध्ये खान बस सर्व्हिसचे मालक, सोने व्यापारी विक्रम अग्रहरी आणि प्रॉपर्टी डीलर गणेश दत्ता मिश्रा यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे मारले.

गणेश दत्त मिश्रा, विक्रम अग्रहरी आणि मुस्ताक खान हे मुख्तार अन्सारी यांचे खूपच जवळचे आहेत. ईडीच्या पथकाने पोलीस पथकासह सर्वांच्या घरांची झडती घेतली आहे.

ED raids multiple places on Mukhtar Ansari
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीस सह-आरोपी - ईडी, पाहा सविस्तर बातमी | SAAM TV

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक गुरुवारी सकाळी ८ वाजता गाझीपूर येथे मुख्तार अन्सारी यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुहम्मदाबादच्या दर्जी टोला येथे त्यांचे निवासस्थान आहे. ईडीची ही कारवाई (ED Raids) अन्सारींचे भाऊ खासदार अफजाल अन्सारी यांच्याविरोधात सुरू आहे.

दरम्यान, अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारने गँगस्टर अॅक्ट अंतर्गत अफजाल अन्सारी यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. याच प्रकरणात पीएमएलए अंतर्गत ईडीचे पथक अफजाल अन्सारी आणि त्यांचे भाऊ मुख्तार अन्सारी यांच्याविरोधात कारवाई करत आहे.

ईडीचे पथक या कारवाईवेळी सीआरपीएफची एक तुकडी घेऊन मुख्तार यांच्या घरी पोहोचले होते. घराबाहेर सीआरपीएफची एक तुकडी तैनात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुणालाही घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. घरात मुख्तार अन्सारीचे भाऊ खासदार अफजाल अन्सारी आहेत.

यापूर्वी मनी लाँडरिंग प्रकरणात ९ मे रोजी खासदार अफजाल अन्सारी यांना समन्स बजावले होते. ईडीच्या प्रयागराज येथील पथकाने त्यांची चौकशीही केली होती. पथकाने त्यांची १० तासांहून अधिक काळ चौकशी करून जबाब नोंदवला होता.

मुख्तार अन्सारी यांच्याविरोधात लखनऊमध्ये मार्च २०२१ मध्ये मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुख्तार यांनी २०२० मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी जमिनीवर कब्जा केला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय लखनऊमध्ये फसवणूक करून जमीन हडपणे आणि आमदार निधी काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तिन्ही आरोपांच्या आधारे त्यांच्याविरोधात मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com