महिला IAS अधिकाऱ्याकडे सापडलं मोठं घबाड; नोटा मोजताना ED पथक थकले

IAS Pooja Singhal : छापेमारी दरम्यान ईडीला पूजा सिंघल यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे.
IAS Pooja Singhal
IAS Pooja SinghalSaam Tv

रांची: बेकायदेशीर खाण प्रकरणात, अंमलबजावणी संचालनायाच्या (ईडी) पथकाने झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांच्या घरावर छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजेपासून पूजा सिंघल आणि त्यांच्या जवळच्या २० व्यक्तींच्या घरांवर ईडीकडून (ED Raids) ही छापेमारी केली जात आहे. अशातच छापेमारी दरम्यान ईडीला पूजा सिंघल यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं आहे. (IAS Pooja Singhal Residence ED Raid)

IAS Pooja Singhal
महिला पोलिसाने स्वतःच्याच होणाऱ्या नवऱ्याला ठोकल्या बेड्या; कारण जाणून थक्क व्हाल

जप्त केलेल्या नोटा कोट्यवधी रुपयांच्या असल्याने नोटा मोजताना ईडी (ED) पथकालाही घाम फुटला. मिळालेल्या माहितीनुसार IAS अधिकारी पूजा सिंघल यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर ईडीला नोटा मोजण्यासाठी चक्क मशीनची गरज भासली आहे. या गोष्टीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा सिंघल यांच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रे तसेच २५ कोटी (25 Crore Cash Recovered) रुपयांची रोख रक्कम ईडीच्या हाती लागली आहे.

बेकायदेशीर खाण प्रकरणात, नाव समोर आल्यानंतर शुक्रवारी सकाळी ५ वाजता ईडीच्या पथकांनी IAS पूजा सिंघल यांच्या घरावर ठिकठिकाणी छापेमारी केली. पंचवटी रेसिडेन्सीच्या ब्लॉक क्रमांक ९, चांदनी चौक, कानके रोड, हरिओम टॉवर, लालपूर येथील नवीन इमारत, रांचीमधील पल्स हॉस्पिटलसह पूजा सिंघल यांच्या बरियातू येथील घरावर छापे टाकण्यात आले. यातील पल्स हॉस्पिटल हे पूजा सिंघल यांचे पती आणि उद्योगपती अभिषेक झा यांच्या मालकीचे आहे. ईडीचे पथक आयएएस पूजा सिंघलच्या अधिकृत निवासस्थानीही पोहोचले आहे.

IAS Pooja Singhal
धक्कादायक! मुलाने आईलाच प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; त्यानंतर घडलं भयंकर

कोण आहे पूजा सिंघल?

पूजा सिंघल या झारखंडच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. सध्या त्यांच्याकडे उद्योग सचिव आणि खाण सचिवपदाचा कार्यभार आहे. याशिवाय पूजा सिंघल या झारखंड राज्य खनिज विकास महामंडळाच्या (JSMDC) अध्यक्षा आहेत. याआधीही पूजा सिंघल या भाजप सरकारमध्ये कृषी सचिव पदावर होत्या. मनरेगा घोटाळ्याच्या वेळी पूजा खुंटी येथे डीसी पदावार तैनात होत्या.

पूजा सिंघल यांच्यावर अनेक गंभीर आरोप

IAS अधिकारी पूजा सिंघल यांनी चतरा, खुंटी आणि पलामू जिल्ह्यांतील उपायुक्त म्हणून म्हणून काम पाहिलं आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे अनेक गंभीर आरोप झाले आहेत. मनरेगा घोटाळ्याच्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने संपूर्ण प्रकरणाच्या माहितीशी संबंधित एक पत्र दाखल केले होते. खुंटी येथे मनरेगामध्ये १८.०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला तेव्हा पूजा सिंघल या उपायुक्त होत्या.

याशिवाय चतरा येथेही पूजा सिंघल या ऑगस्ट २००७ ते २००८ या कालावधीत उपआयुक्त होत्या. तिथेही त्यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप होता. याशिवाय पलामूमध्ये उपआयुक्त असताना पूजा सिंघल यांच्यावर सुमारे ८३ एकर जमीन खाणकामासाठी खासगी कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com