
दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून गगनाला भिडलेल्या खाद्यतेलाची किंमत घटू लागली आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने (central government) खाद्यतेलांवरील (edible oil) आयात शुल्क (import duty) कमी केले आहे. परिणामी अनेक कंपन्या तेलाच्या किंमती कमी करु लागल्या आहेत. अडीच वर्षांपूर्वीपर्यंत सोयाबीन आणि सूर्यफूल आयातीवर 38.25 टक्के शुल्क होते. सध्या चार दशलक्ष टन सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या खाद्यतेलावर शून्य टक्के शुल्क आहे. तसेच दोन वर्षांसाठी आयात करण्याची परवानगी आहे. परदेशातील ऐतिहासिक मंदीच्या पार्श्वभूमीवर, खाद्यतेलाची किंमत परदेशी बाजारात लक्षणीयरीत्या घटली. तेलाच्या दरात किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट झाली आहे. परिणामी देशातील बाजारपेठेत काही अंशी तेलाचा दर उतरला आहे. (edible oil price latest marathi news)
परदेशात खाद्यतेलाचे दर किलोमागे ५० ते ६० रुपयांनी घसरल्याने आयात शुल्कात अनेकवेळा कपात केल्यानंतर दोन वर्षे शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्याचे कारण समजणे अनाकलनीय असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याची दुसरी बाजू पाहता या घसरणीचा फायदा ना ग्राहकांना, ना तेल उद्योगाला, ना शेतकऱ्यांना मिळत आहे असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
बाजारात मोहरीची आवक कमी होत असून, सणासुदीच्या काळात त्याचा तीव्र टंचाई जाणवू शकते. विदेशी तेलांच्या तुलनेत देशांतर्गत तेलांना मागणी असून, त्यामुळे शेंगदाणा तेल, तेलबिया आणि कापूस तेलाचे दर पूर्वीच्याच राहिले आहेत.
अदानी विल्मर आणि मदर डेअरीने दहा ते 15 रुपये कमी केले. त्यामुळे किरकोळ बाजारात सूर्यफूल तेलाला प्रतिलिटर १७५ ते १८० रुपये दर मिळत आहे. सोया तेलाच्या दरातही घट झाली आहे. सध्या आयात केलेल्या पामतेलाचे भाव स्थानिक पातळीवर रुपये २७००/१५ किलो तर भुईमूग आणि कापूस बियाणांची किंमत २५५० रुपये आहे.
दिल्लीत तेलाचा दर शनिवारी घटला.
तेल आणि तेलबियांचे भाव पुढीलप्रमाणे राहिले
मोहरी तेलबिया - रु 7,485-7,535 (42 टक्के स्थिती दर) प्रति क्विंटल.
भुईमूग - रु. 6,765 - रु 6,890 प्रति क्विंटल.
भुईमूग तेल मिल डिलिव्हरी (गुजरात) - रु 15,710 प्रति क्विंटल.
भुईमूग सॉल्व्हेंट रिफाइंड तेल रु. 2,635 - रु. 2,825 प्रति टिन.
मोहरीचे तेल दादरी - 15,150 रुपये प्रति क्विंटल.
सरसों पक्की घणी - रु. 2,380-2,460 प्रति टिन.
सरसों कच्ची घणी - रु. 2,420-2,525 प्रति टिन.
तिळाचे तेल मिल डिलिव्हरी - रु 17,000-18,500 प्रति क्विंटल.
सोयाबीन ऑइल मिल डिलिव्हरी दिल्ली - 14,100 रुपये प्रति क्विंटल.
सोयाबीन मिल डिलिव्हरी इंदूर - रुपये 13,800 प्रति क्विंटल.
सोयाबीन तेल देगम, कांडला – रु. १२,४०० प्रति क्विंटल.
सीपीओ एक्स-कांडला - 11,300 रुपये प्रति क्विंटल.
कापूस बियाणे मिल डिलिव्हरी (हरियाणा) - रु 14,150 प्रति क्विंटल.
पामोलिन आरबीडी, दिल्ली - 13,200 रुपये प्रति क्विंटल.
पामोलिन एक्स-कांडला - रु 12,100 (जीएसटी शिवाय) प्रति क्विंटल.
सोयाबीन धान्य - 6,500-6,550 रुपये प्रति क्विंटल.
सोयाबीन रु. ६,३०० ते रु. ६,३५० प्रति क्विंटल.
मका खल (सारिस्का) प्रति क्विंटल 4,010 रु.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.