चिनी मोबाईल कंपनी Xiaomi विरुद्ध ED ची मोठी कारवाई! जप्त केले 5,551 कोटी

एक मोठी कारवाई करत, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चीनी मोबाईल कंपनी Xiaomi India चे 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत.
चिनी मोबाईल कंपनी Xiaomi विरुद्ध ED ची मोठी कारवाई! जप्त केले 5,551 कोटी
XiaomiSaam Tv

एक मोठी कारवाई करत, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चीनी मोबाईल कंपनी Xiaomi India चे 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. ही कारवाई परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 (FEMA) अंतर्गत करण्यात आली आहे. Xiaomi India ही चीन आधारित Xiaomi समूहाची संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पाठवलेल्या पैशाच्या संदर्भात या वर्षी फेब्रुवारीमध्ये ED ने Xiaomi विरुद्ध तपास सुरू केला होता. (ED Action On Xiaomi)

Xiaomi
KGF स्टार यशने नाकारली करोडोंची ऑफर; जाहिरात करण्यास दिला नकार!

अंमलबजावणी संचालनालयाच्यानुसार, Xiaomi ने 2014 मध्ये भारतात आपली सेवा सुरू केली होती. त्यासाठी 2015 पासून पैसे बाहेर पाठवण्यास सुरुवात झाली होती. कंपनीने फेब्रुवारीमध्ये बेकायदेशीरपणे पैसे बाहेर पाठवल्याप्रकरणी तपासाच्या आधारे ईडीने कंपनीच्या बँक खात्यातून ही रक्कम जप्त केली. कंपनीने रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे विदेशी चलन तीन परदेशी-आधारित संस्थांना पाठवल्याचा आरोप आहे. ज्यामध्ये Xiaomi ग्रुपचे एक युनिट देखील समाविष्ट आहे.

यानंतर, त्यांना 5,5513 कोटी रुपये पाठवले. ईडीने आरोप केला, ही रक्कम त्यांच्या चिनी मूळ कंपनीच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस आधारित (US Based) असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील Xiaomi समूहाच्या फायद्यासाठी पाठवण्यात आली होती, अशी माहिती ईडीने दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.