Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसला ऑपरेशन लोटसची भीती; आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार

Jai Ram Thakur Vs. Pratibha Singh In Himachal Pradesh Election 2022: हिमाचल प्रदेशात ६८ जागांपैकी ४० जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे, तर २५ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
Jai Ram Thakur Vs. Pratibha Singh In Himachal Pradesh Election 2022
Jai Ram Thakur Vs. Pratibha Singh In Himachal Pradesh Election 2022Saam TV

Himachal Pradesh Election 2022 : गुजरात आणि हिमाचलप्रदेश या दोन राज्यांच्या निवडणुकांचे कल (Election 2022) आता हाती येत आहेत. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू आहे. ताज्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि कॉग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशात ६८ जागांपैकी ४० जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे, तर २५ जागांवर भाजप आघाडीवर आहे. कॉंग्रेसच्या विजयाची शक्यता जास्त दिसत असतानाच कॉंग्रेसला आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची भीती सतावत आहे. त्यामुळे आता कॉंग्रेस आपल्या विजयी उमेदवारांना राजस्थान येथील एका रिसॉर्टमध्ये हलवणार असल्याची माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिली आहे. (Operation Lotus In Himachal Pradesh)

Jai Ram Thakur Vs. Pratibha Singh In Himachal Pradesh Election 2022
Maharashtra Politics: राज्यात पुन्हा एकदा भाजपचं ऑपरेशन लोटस?

देशात दोन राज्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती येत आहे. गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत आहे तर, हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसचा विजय होण्याची चिन्हे आहेत. अशा कॉंग्रेसला आपल्या विजयाच्या आनंदापेक्षा भाजपच्या ऑपरेशन लोटसची जास्त भीती वाटत आहे. कॉंग्रेस ४० जागांसह सध्या आघाडीवर आहे, तर भाजप २५ जागांवर पुढे आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात कॉंग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे.

अशात आपल्या विजयी उमेदवारांना भाजपपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसने आपल्या आमदारांना राजस्थानला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या एका रिसॉर्टमध्ये कॉंग्रेसच्या आमदारांना ठेवले जाऊ शकते अशी माहिती साम टीव्हीला सुत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

भाजपला बंडखोरीचा फटका

हिमाचल प्रदेशात भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा फटका बसला आहे. नालागडहून अपक्ष उमेदवार के एल ठाकूर हे आघाडीवर आहेत. ठाकूर हे भाजपचे माजी आमदार आहे. हिमाचलप्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर ते नाराज असल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या निवडणुकीत हिमाचलप्रदेशात भाजपने  (BJP) ४४ जागा घेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा मात्र, भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. २५ ते ३५ जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी २१ जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस जवळपास ४० जागांवर आघाडीवर आहे.

Jai Ram Thakur Vs. Pratibha Singh In Himachal Pradesh Election 2022
Aam Aadmi Party : आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष होणार? राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय आहेत निकष? वाचा सविस्तर...

हिमाचलसाठी भाजपचा प्लॅन बी तयार! देवेंद्र फडणवीसांकडे मोठी जबाबदारी

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हिमाचलप्रदेशात मोठी जबाबदारी मिळाली आहे. भाजपला हिमाचलप्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी जागा कमी पडल्या तर देवेंद्र फडणवीस अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन येथे सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. सध्या देवेंद्र फडणवीस हे हिमाचलच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

हिमाचल प्रदेश मध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपचा प्लान बी तयार केला आहे. जागा कमी पडल्यास तिथे असलेल्या अपक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे दोन दिग्गज नेते हिमाचल प्रदेशाकडे रवाना झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com