Shivsena Symbol Crisis : शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही; ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा दावा

शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर कादपत्रेच दिली नाही. त्यामुळे शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणता येणार नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली आहे. दुपारी ४ वाजेपासून या सुनावणीला सुरूवात झाली असून ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर अतिशय मजबुतीने ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. त्यांनी शिंदे गटाचे अनेक दावे खोडून काढले आहेत. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Maharashtra Politics : मोदींच्या सभेतील CM शिंदेंच्या भाषणानंतर ठाकरे गट टाकणार डाव, EC समोरील सुनावणीआधीच...

निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) शिंदे गटाचे सर्व दावे फेटाळले, तसेच बंडानंतर महिनाभर शिंदे गट शांत का होता? असा सवाल ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर (Election Commission) कादपत्रेच दिली नाही. त्यामुळे शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणता येणार नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

इतकंच नाही तर, बंडानंतर झालेल्या शिवसेनेच्या दोन बैठकांना उपस्थित राहण्याचे आदेश काढूनही बंडखोर हजर राहिले नाही, निवडणूक आयोगात येण्याचं ठरल्यानंतर एक दिवस आधी प्रतिनिधी सभा घेतल्याचाही आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. (Eknath Shinde

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Viral Video : भररस्त्यात शाळकरी मुलींमध्ये तुफान हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

त्याचबरोबर ठाकरे गटाची कार्यकारणी बरखास्त होऊ शकत नाही. एकनाथ शिंदे यांची जाहीर केलेली राष्ट्रीय कार्यकारणी बेकायदेशीर असल्याचंही ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीला मुदतवाढ द्या. किंवा निवडणूक घ्या, अशी मागणी सुद्धा कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगासमोर केली आहे. २३ जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान, शिंदे गटांच्या वकिलांचा युक्तीवाद सुरू होणे अजून बाकी आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com