यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरला लागत होती आग; समोर आले मोठे कारण

केंद सरकारने याचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल आला आहे.
Ola Electric Scooter
Ola Electric Scooter Saam Tv

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ओला, ओकिनावापासून ते प्युअर इलेक्ट्रीक स्कूटरपर्यंत कधी चार्जिंग करताना तर कधी रस्त्यावर पेटली आहे. यावर केंद सरकारने याचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल आला आहे. सरकारने स्थापन केलेल्या तपास समितीला प्राथमिक तपासणीत जवळपास सर्व इलेक्ट्रिक दुचाकींमध्ये बॅटरी सेल/डिझाइनमध्ये समस्या आढळल्या आहेत. समितीचा हा अहवाल ईव्ही दुचाकी उत्पादकांना अडचणीत आणू शकतो.

हे देखील पाहा -

गेल्या महिन्यात, तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात सुद्धा इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता इतर दोघे जखमी झाले होते. तेलंगणातील बॅटरी स्फोट प्रकरणासह जवळपास सर्वच घटनांमध्ये समितीच्या सदस्यांना बॅटरीच्या डिझाइनमध्ये तसेच बॅटरी सेलमध्ये सदोष आढळून आले आहेत. आतापर्यंत जवळपास 25 ई-स्कूटर्सना आग लागण्याच्या किंवा स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. यावर केंद्राने कंपन्यांना त्यांच्या इलेक्ट्रीक गाड्यांचे लाँचिंग थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

ईलेक्ट्रीक स्कूटरचा खप वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून बॅटरीवर सबसिडी देण्यात येते. याच बॅटऱ्या सदोष असल्याने स्कूटरना आगी लागल्याचे कारण समोर आले आहे. त्यामुळे आता या वाहनांच्या उत्पादकांवर बॅटरीचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकार दबाव आणू शकते.

Ola Electric Scooter
भुईमूग राखणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून

ई-वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ आता बॅटरी समस्या सोडवण्यासाठी ईव्ही उत्पादकांशी संपर्क साधून उपाय सुचवतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी अनिवार्य विमा काढण्याचे निर्देश मागणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने या आठवड्यात केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली. विमा संरक्षणाव्यतिरिक्त, याचिकेत निर्मात्यांना वाहनात विश्वसनीय आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून अति तापणे आणि आगीचे अपघात टाळता येतील.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com