Russia-Ukraine War: रशियाच्या हल्लात युक्रेनकडून लढणाऱ्या महिला शार्प शूटरला वीरमरण

Russia-Ukraine War Marathi News: थालिता डो व्हॅले (Thalita do Valle) नावाची ही महिला एक मॉडेल आणि स्नायपर असून त्या ३९ वर्षांच्या होत्या.
Elite sniper and model from Brazil has been killed by Russian forces in Ukraine, Russia Ukraine news
Elite sniper and model from Brazil has been killed by Russian forces in Ukraine, Russia Ukraine newsTwitter/@BlogPageNFound

खार्किव, युक्रेन: रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आजचा १३३ वा दिवस आहे. जवळपास चार महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या या युद्धात युक्रेनची हजारो नागरिक मारले गेले आहेत. तरीही युक्रेनकडून रशियाचा जोरदार प्रतिकार केला जातोय. ३० जूनला रशियाने खार्किव शहरावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला (Missile Attack) केला. या हल्ल्यातही अनेक नागरिक मारले गेले. यात युक्रेनडून रशियाविरोधात लढणाऱ्या एका ब्राझिलियन महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. थालिता डो व्हॅले (Thalita do Valle) नावाची ही महिला एक मॉडेल आणि स्नायपर असून त्या ३९ वर्षांच्या होत्या. (Russia-Ukraine War News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील बंकरवर रशियन हल्ल्यात ब्राझिलियन मॉडेल आणि फायटर थालिता डो व्हॅले यांचा मृत्यू झाला. युद्धग्रस्त युक्रेन देशाच्या ईशान्येकडील खार्किव शहरावर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात ३९ वर्षीय थालिता डो व्हॅले यांचा ३० जूनला मृत्यू झाला. सोबतच या हल्ल्यात ब्राझीलचे माजी सैनिक डग्लस बुरिगो, वय ४० यांचाही मृत्यू झाला आहे, ते थलिता यांनी शोधण्यासाठी बंकरमध्ये परत गेले होते. इतर सैनिकांच्या म्हणण्यानुसार, पहिला क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर मागे राहिलेली ती एकमेव सैन्य सदस्य होती.

थालिताला मागील संघर्षांचा अनुभव होता कारण त्यांनी इराकमधील इस्लामिक स्टेट विरुद्धही लढा दिला होता, ज्याचे त्यांच्या यूट्यूब (YouTube) चॅनेलवर व्हिडिओही आहेत. त्या काळात, त्यांनी इराकच्या स्वतंत्र कुर्दिस्तान प्रदेशाच्या सशस्त्र सैन्य दलात सामील झाल्यामुळे तिला स्निपरचे (Sniper Elite) प्रशिक्षण मिळाले. (latest Russia Ukraine News)

थलिता या कायद्याच्याही विद्यार्थिनी होत्या, त्यांनी एनजीओसह प्राणी बचाव कार्यात भाग घेतला आणि तरुण असताना मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काम केले. त्यांचे भाऊ थिओ रॉड्रिगो व्हिएरा यांनी त्यांचे जीवन वाचवण्याच्या आणि मानवतावादी मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी एक नायक म्हणून वर्णन केले. त्यांनी स्पष्ट केले की, थालिता फक्त तीन आठवडे युक्रेनमध्ये होती, जिथे ती बचावकर्ता तसेच शार्पशूटर म्हणून काम करत होती. रशियन सैन्यापासून संरक्षण देण्यासाठी देखील ती जबाबदार होती.

युक्रेनची राजधानी कीवमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वाचल्यानंतर, थालिताने तिच्या कुटुंबियांना समजावून सांगितले होते की, रशियन ड्रोनद्वारे मोबाइल फोनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याने ती फोनवर जास्त बोलू शकत नाही आणि ती बरी आहे हे त्यांना सांगण्यासाठीच स्वतःहून कॉल करेल. थालिता यांनी नुकतीच खार्किव शहरात गेल्यानंतर गेल्या आठवड्यात सोमवारी परिवाराशी बातचीत केली होती. (Latest Marathi News)

Elite sniper and model from Brazil has been killed by Russian forces in Ukraine, Russia Ukraine news
Anastasiia Lenna : मिस ग्रँड युक्रेनने उचललं शस्त्र, अनास्तासिया लेना युक्रेन सैन्यात सहभागी; पाहा व्हिडीओ

दरम्यान रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या महायुद्धाचा १३३ वा दिवस उलटत आहे, पण हे युद्ध किती काळ चालेल आणि कुठे थांबेल, हे कोणालाच माहीत नाही. सर्व निर्बंधानंतरही रशिया आपल्या आग्रहापासून मागे हटायला तयार नाही, तो दिवसेंदिवस आक्रमक होत चालला आहे. त्याच वेळी, युक्रेन देखील रशियाशी जोरदार लढा देत आहे. पण, या युद्धात फक्त विनाशच दिसतो. हजारो रशियन आणि युक्रेनियन सैनिक मारले गेले, या भीषण युद्धात अब्जावधी डॉलर्सची शस्त्रे नष्ट झाली आहेत आणि त्याचवेळी युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये शांतता पसरली आहे. चार महिन्यांनंतरही हे युद्ध किती काळ चालेल, हे कोणालाच माहीत नाही.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com