Emergency Alert Notification: तुमच्या मोबाईलवरही सकाळी एक इमर्जन्सी अलर्ट आला का? घाबरू नका, जाणून घ्या काय आहे त्याचा अर्थ

Emergency alerts popped on mobile phones: देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास हा इमर्जन्सी अलर्ट आला आहे.
Emergency alerts popped on mobile phones
Emergency alerts popped on mobile phonessaam tv

Government Emergency Alert Notification: अनेकांच्या स्मार्टफोनवर सकाळी एक अलर्ट मेसेज आला. भारत सरकारच्या नावाने आलेला हा मेसेज नेमका काय आहे? हे न कळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यात चिंता वाटून घेण्याचे काही कारण नाही. देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास हा इमर्जन्सी अलर्ट आला आहे.

तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर काळजी करू नका. यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या स्मार्टफोनला कोणताही धोका नाही. भारत सरकारच्या विभागाकडून करण्यात आलेली ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.

Emergency alerts popped on mobile phones
PM Modi On Manipur Viral Video : मला प्रचंड राग आलाय; दोषींना सोडणार नाही; मणिपूरमधील घटनेवर PM मोदींना संताप अनावर

चाचणी नेमकी कशासाठी घेण्यात आली?

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने या अलर्टच्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेतली. त्याचा हा मेसेज होता.

एखाद्या विषयाची देशभरातील नागरिकांना एकाच वेळी माहिती देण्यासाठी आणि लोकांना अलर्ट करण्यासाठी ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. याच यंत्रणेची चाचणी करण्यात आली आणि त्याचा मेसेज देशभराती नागरिकांना गेला आहे. त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. (Irshalwadi landslide)

मराठी भाषेतही आलं नोटिफिकेशन

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने पाठवलेल्या या चाचणी संदेशात मराठी भाषेतही अलर्ट आला होता. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळात म्हणजे १०.३१ वाजता मराठीमध्ये एक अलर्ट आला. यामुळे इंग्रजी येत नसलेल्या लोकांनाही केंद्र सरकारचा अलर्ट कळण्यास मदत होणार आहे. (Tajya Marathi Batmya)

Emergency alerts popped on mobile phones
Raigad Irshalwadi landslide: जिथून आवाज येत होता, तिथे जाऊन शोधत होतो... दरड कोसळ्यानंतर सर्वात आधी पोहोचलेल्या तरुणांनी सांगितली भयावह परिस्थिती

ब्रिटनमध्येही झाली होती अशीच चाचणी

टेलिकम्युनिकेशन विभागाने आज पाठवलेला अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता. त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही. यापूर्वी एप्रिल महिन्यात ब्रिटनमध्येही अशाच प्रकारची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीवेळी 'कीप काल्म अँड कॅरी ऑन' असा संदेश यूकेमधील सर्व नागरिकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com