
नवी दिल्ली: रेपो दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आरबीआयचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले आहेत. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी जूनच्या सुरुवातीच्या पतधोरण आढावा बैठकीत ही वाढ करण्यात येण्याचे संकेत आहेत. किरकोळ चलनवाढ गेल्या चार महिन्यांपासून मध्यवर्ती बँकेच्या समाधानकारक पातळीच्यावर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कोणतीही पूर्वसूचना न देता रेपो दर ०.४० टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. आरबीआय (RBI) ने चार वर्षांनंतर रेपो दरात वाढ केली होती.
रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याबद्दल विचार करण्यासारखे फार काही नाही. पण ही वाढ किती होईल, सांगु शकत नाही. ते ५.१५ टक्क्यांपर्यंत वाढेल असे म्हणणे कदाचित फारसे अचूक नाही. चलनविषयक धोरण समितीची पुढील बैठक ६ ते ८ जून रोजी होणार आहे, अशी माहिती शक्तीकांत दास यांनी दिली. आरबीआयने (RBI) या महिन्याच्या सुरुवातीला कोणत्याही कल्पनेशिवाय रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली. चार वर्षात पहिल्यांदाच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.
रशिया-युक्रेन (Russia) युद्धामुळे वाढत्या तणावाचे कारण देत एप्रिलमध्ये आपल्या चलनविषयक धोरणाच्या आढावा बैठकीत केंद्रीय बँकेने चालू आर्थिक वर्षातील चलनवाढीचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर नेला आहे. तसेच २०२२-२३ साठी जीडीपी अंदाज ७.८ टक्क्यांवरून ७.२ टक्क्यांवर आणला. 'महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकारने नवीन पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असंही दास म्हणाले.
गेल्या दोन-तीन महिन्यांत रिझर्व्ह बँकेने (RBI) महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. आणि पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यासारखे पाऊले उचलले जात आहेत. या सर्व उपायांमुळे वाढती महागाई आटोक्यात आणण्यास मदत होईल, असंही दास म्हणाले.
महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) दोन दिवसापूर्वी इंधन दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल (Petrol) ९ रुपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपयांनी कमी केले आहे. महागाई विरोधात केंद्र सरकारनेही पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.