Pegasus: फ्रेंच राष्ट्रअध्यक्षांनी बदलला फोन नंबर तर युरापिय देश चिंतेत

पेगाससद्वारे (Pegasus Spyware Issue) विशेष लोकांची हेरगिरी करण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले.
Pegasus: फ्रेंच राष्ट्रअध्यक्षांनी बदलला फोन नंबर तर युरापिय देश चिंतेत
Pegasus: फ्रेंच राष्ट्रअध्यक्षांनी बदलला फोन नंबर तर युरापिय देश चिंतेतSaam Tv

पेगाससद्वारे (Pegasus Spyware Issue) विशेष लोकांची हेरगिरी करण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले. पेगाससने हेरगिरी केलेल्या लोकांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron President Of France) यांचे नावही समोर आले आहे. हे लक्षात घेता त्यांनी विनाविलंब आपला नंबर बदलला आहे. ही माहिती राष्ट्रपती कार्यालयाने दिली आहे.

राष्ट्रपती कार्यालयाच्या वतीने रॉयटर्सला या संदर्भात माहिती दिली आहे. मॅक्रॉन अनेक फोन वापरत असतात. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर हेरगिरी केली जात आहे. परंतू अतिरिक्त सुरेक्षेसाठी त्यानी आपला नंबर बदलला आहे अशी माहिती राष्ट्रपती कार्यालयाने दिली आहे. फ्रान्स सरकारच्या प्रवक्त्याच्या वतीने असे म्हटले आहे की राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी आणखी काही पावले उचलली जात आहेत. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.

Pegasus: फ्रेंच राष्ट्रअध्यक्षांनी बदलला फोन नंबर तर युरापिय देश चिंतेत
Google Doodle कडून टोकियो ऑलिम्पिकचे विशेष स्वागत

19 जुलै रोजी प्रथमच हा खुलासा झाला होता की इस्रायली कंपनी स्पायवेअर पेगाससच्या माध्यमातून बर्‍याच जणांची हेरगिरी करत आहे. ज्यांची हेरगिरी केली जात आहे त्यात सरकार, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते इत्यादींसह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. बातमी एजन्सी रॉयटर्सने रेडिओ फ्रान्सच्या हवाल्याने असे म्हटले आहे की मोरोक्कोच्या सांगण्यावरून मॅक्रॉनवर यांची हेकगिरी केली जात आहे.

मात्र, खुद्द राष्ट्रपतींनी हे अहवाल चुकीचे म्हटले आहेत. मॅक्रॉन यांची हेरगिरी केली जात होती की नाही याची पुष्टी झालेली नाही. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि फोर्बिडन स्टोरीज यांनी मोरोक्को मॅक्रॉन यांची हेरगिरी करत असल्याची माहिती दिली आहे. त्याविरूद्ध मोरोक्कोने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून या दोघांविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला आहे.

पेगाससची चिंता फक्त फ्रान्समध्येच बाहेर येत नाही तर यामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. भारतातही याबाबत राजकीय वर्तुळात गदारोळ सुरू आहे. फ्रान्सशिवाय इतर युरोपियन देशांमध्येही हेच आहे. पेगासस हेरगिरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जर्मन चांसलर अँजेला मर्केल म्हणाले की, ज्या देशांना हे समजत नाही आणि ज्या देशांनी त्याचा गैरवापर केला त्यांना त्याची सुविधा देऊ नये.

हंगेरीमध्येही तक्रारी आल्यानंतर त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे इस्त्रायलनेही या गोष्टीला गांभीर्याने घेतले असून त्याचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. ही टीम मीडिया संस्थांच्या वृत्तांचे मूल्यांकन करेल. या संपूर्ण प्रकरणावर पेगाससची कंपनी एनएसओने म्हटले आहे की त्यांचा कार्यक्रम फक्त गुन्हेगारी आणि दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की जर त्यांना अशी काही तक्रार आली तर ते त्या देशाला यादीतून वगळता ते सॉफ्टवेअर परत घेऊ शकतात.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com