ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO

रस्त्यावर पडलेल्या या पैशांना गोळा करण्याकरिता लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली
ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO
ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEOSaam Tv

वृत्तसंस्था : तुम्ही कधी पैशांचा पाऊस पडताना बघितलं आहे का? अमेरिकेमध्ये चक्क पैशांचा पाऊस पडला आहे. अमेरिकेमधील दक्षिण कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर पैशांचा पाऊस पडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रस्त्यावर पडलेल्या या पैशांना गोळा करण्याकरिता लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. प्रत्येकजण रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलताना दिसत आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दक्षिण कॅलिफोर्नियात एका महामार्गावर १ ट्रक सॅन दिएगोहून फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पकडे जात होते. या ट्रकमध्ये अनेक पैशांनी भरलेल्या पिशव्या ठेवले होते. ट्रक वेगात असताना अचानक या पैशांच्या पिशव्या फाटले गेले आणि या रस्त्यावर पैशांचा पाऊस पडणे सुरू झाले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लांब- लांबवरून लोक पैसे गोळा करण्याकरिता येत आहेत.

रस्त्यावर पडलेल्या बहुतांश नोटा १ डॉलर ते २० डॉलरच्या आहेत. ट्रकमधून पैशांची बॅग पडल्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागले होते. पैसे रस्त्यावर पडल्यावर त्या मार्गाने जाणारा प्रत्येकजण पैसे घेण्याकरिता गाडीबाहेर पडला आणि पैसे गोळा करू लागला आहे. डेमी बॅग्बी नावाच्या एका महिला बॉडी बिल्डरने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने स्वतः नोटा हातात धरले आहेत. आणि ती म्हणते, मी आतापर्यंत बघितलेली ही सर्वात आश्चर्यकारक घटना आहे.

ट्रकमधून नोटा पडल्यानं रस्त्यावरच 'पैशाचा पाऊस'; पैसे लुटण्यासाठी जमली तोबा गर्दी; पाहा VIDEO
आयएनएस विशाखापट्टणम आज नौदलात; स्वदेशी युद्धनौकेनं नौदलाची ताकद वाढणार

प्रत्येकजण रस्त्यावर पैसे घेण्याकरिता आपली कार थांबवत आहे. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी लोकांना पैसे परत करण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी या घटनेमध्ये किती पैसे गमावले हे सांगितले नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक लोकांनी रस्त्यावर उचललेली रोकड कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल CHP ला परत केली होती. घटनेनंतर २ तासांनी महामार्ग खुला करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com