प्रेयसीच्या लग्नात प्रियकराची एन्ट्री; नवरदेवासमोरच नवरीच्या भांगेत भरलं कुंकू, त्यानंतर...

Wedding Drama : प्रेमकथेवर आधारित एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये पाहायला मिळाला आहे.
प्रेयसीच्या लग्नात प्रियकराची एन्ट्री; नवरदेवासमोरच नवरीच्या भांगेत भरलं कुंकू, त्यानंतर...
couple wedding SaamTv

पटना: सनई-चौघड्याच्या सुरात नवरदेवाचं लग्नमंडपात आगमन झालं. नवरीही नटून थटून स्टेजवर आली. आता गुरूजी मंत्र सुरू करणार इतक्यात नवरीचा प्रियकर स्टेजवर आला. प्रियकराने नवरदेवाच्या हातातून वरमाळा हिसकावली आणि थेट नवरीच्या गळ्यात टाकली. इतकंच नाही तर त्याने नवरीच्या भांगेत कुंकुही भरलं. प्रेमकथेवर आधारित एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये पाहायला मिळाला आहे.

couple wedding
नवरदेव दारुच्या नशेत दिसताच नवरी संतापली; भर मंडपात सिनेस्टाईल हाणामारी

बिहारमधील पटना शहरातून ही 'अजब लग्नाची गजब' गोष्ट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पटना शहरातल्या इरे गावातील एका तरुणीचं अमित कुमार नामक तरुणावर प्रेम जडलं होतं. दोघांनीही आपल्या प्रेमाचा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला होता. मात्र तरुणीच्या वडिलांना हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यांनी लग्नाला नकार देत आपल्या मुलीचा विवाह नवादा जिल्ह्यातील अक्षय पांडे या तरुणासोबत करण्याचं ठरवलं.

देवाण-घेवाणाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तारीखही ठरवली. त्यानुसार सोमवारी (2 मे) रोजी नवरदेवाकडील वऱ्हाडी मंडळी वाजत गाजत इरे गावात पोहचले. आता काही क्षणात लग्न उरकणार आणि आपले हाताचे-दोन हात होणार म्हणून नवरा मुलगाही खूश होता. तर नवीन नवरी सोबत घेऊन जाण्यासाठी आलेली वऱ्हाडी मंडळीही हातात अक्षदा घेऊन गुरूजींची वाट बघत होती.

couple wedding
समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण

आता गुरूजी लग्नाचे मंगलाष्टक सुरू करणार इतक्यात नवरीचा प्रियकराने स्टेजवर सिनेस्टाईल उडी घेतली. त्यानंतर प्रियकराने नवरदेवाच्या हातातील वरमाळा हिसावून घेत नवरीच्या गळ्यात टाकली. इतकंच नाही तर, त्याने नवरीच्या भांगमध्ये कुंकुही भरलं. काही क्षणातच हा सर्व प्रकार घडल्यामुळे लग्नमंडपात गोंधळ उडाला. लग्नमंडपात उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी हातातील अक्षदा खाली टाकत नवरीच्या प्रियकराला पकडलं आणि चोप देण्यास सुरूवात केली.

दरम्यान, प्रियकराला चोप देत असल्याचं बघून नववधूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वऱ्हाडी मंडळी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेलं आणि पोलिसांनी भर मंडपातूनच प्रियकराला ताब्यात घेतलं. याबाबत नवरीच्या कुटुंबीयांनी स्थानिक शहाजहानपूर पोलीस ठाण्यात कोणतीही लेखी तक्रार केलेली नाही. तरुणीच्या बाजूने तरुणाविरुद्ध कोणतीही लेखी तक्रार न केल्याने पोलिसांनी प्रियकर अमित कुमारला सोडून दिलं. या संपूर्ण प्रकारानंतर नवरदेवासह वऱ्हाडी मंडळी हताश होऊन लग्न मंडपातून बाहेर पडले. त्यानंतर नवरीचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावण्यात आलं.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.