
6 Reasons Why RBI Withdrawing 2,000 rupees Notes : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन देशाचे माजी आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन (Dr Krishnamurthy Subramanian) यांनी केले आहे.
सुब्रमण्यम म्हणाले की, देशात पोलिसांच्या अनेक छाप्यांमध्ये 2000 च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांचा साठा करण्यासाठी वापर केला जात होता. डॉ. कृष्णमूर्ती हे 2018 ते 2021 पर्यंत मुख्य आर्थिक सल्लागार होते.
ते म्हणाले की, 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय एक चांगलं पाऊल आहे. हे पाऊल महत्त्वाचे का आहे, याची त्यांनी सहा कारणे सांगितली आहेत. (Latest Marathi News)
1. पोलिसांनी धाडीत अनेक ठिकाणी छापे टाकून 2000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यावरून हे सिद्ध होते की, या चलनाचा वापर मुख्यत्वे पैसे साठवण्यासाठी केला जात होता. यात कायदेशीररित्या 2 हजारांच्या नोटा असणाऱ्या 80 टक्के लोकांकडे त्यांच्या ठेवींमध्ये फक्त 20 टक्के नोटा आहे. तर यात काळाबाजार करणाऱ्यांकडे 80 टक्के नोटा जमा आहेत.
2. या निर्णयामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही. कारण 2000 रुपयांच्या नोटा आर्थिक व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात नाहीत.
3. मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असल्याने, विशेषत: 2000 रुपयांच्या नोटांच्या प्रत्यक्ष चलनाच्या वापरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
4. 2000 रुपयांच्या नोटेऐवजी 500 रुपयांची नोट बदलण्याचे माध्यम म्हणून वापरली जाऊ शकते.
5. डिजिटल व्यवहार आतापासून 2026 पर्यंत 3 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे बदलाचे माध्यम म्हणून 2000 च्या नोटेची गरज येत्या काही वर्षांत आणखी कमी होईल.
6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरबीआयने म्हटल्याप्रमाणे 2000 रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील. ज्यांच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत ते त्या जमा किंवा बदलू शकतात. नोटा बदलण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. ही मुदत वाढवली ही जाऊ शकते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.