विवाहबाह्य संबंध ठेवाल तर खबरदार! 'लिव्ह-इन'मध्ये राहणाऱ्यांवरही येईल पश्चातापाची वेळ

विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या सुधारित विधेयकाला इंडोनेशियातील संसदेने मान्यता दिलीय.
Extramarital Affair
Extramarital Affair Saam TV

Indonesia News : इंडोनेशियात बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आणि वादग्रस्त ठरलेल्या विवाहबाह्य लैंगिक संबंधांवर बंदी घालणाऱ्या सुधारित विधेयकाला मंगळवारी संसदेत मान्यता देण्यात आली. फौजदारी संहितेतील सुधारणेनुसार, आता विवाहबाह्य संबंध ठेवणे दंडात्मक गुन्हा ठरणार आहे. हा गुन्हा केला तर, एका वर्षांचा तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा इंडोनेशियात वास्तव्यास असलेले नागरिक आणि विदेशात गेलेल्या नागरिकांनाही लागू आहे.

कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयानं सांगितलं की, सर्वसंमतीनंतर हे सुधारित विधेयकाची अंमलबजावणी होण्यासाठी किंवा हा कायदा लागू होण्यासाठी राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी गरजेची आहे. त्यानंतरही या सुधारित विधेयकाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. (Live in Relationship)

मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नव्या फौजदारी संहितेत बरेच नियम लागू केले जाणार आहेत. त्यावर अद्याप काम सुरू आहे. एका वर्षात या गोष्टी होणे शक्य नाही. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. (Latest Marathi News)

Extramarital Affair
Relationship Tips : कारमध्ये लैंगिक संबंध ठेवणे पडू शकते महागात, असे करण्याआधी 'हे' वाचा

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणेही ठरणार गुन्हा

सुधारित विधेयकातील तरतुदीनुसार, इंडोनेशियात आता लिव्ह-इन - रिलेशनशिपमध्येही राहणे गुन्हा ठरणार आहे. लिव्ह-इनमध्ये राहणारे जोडपेही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. हा गुन्हा केल्यास सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.

नव्या सुधारित विधेयकातील तरतुदीनुसार, देशात आता गर्भनिरोधक आणि धार्मिक टीका करणंही अवैध आहे. त्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

Extramarital Affair
Bloating In Periods : मासिक पाळीदरम्यान ब्लोटिंग होतो? 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com