विना वीज या व्यक्तीने चालवला फॅन; व्हिडिओ व्हायरल

अनेकांना वीजपुरवठा खंडित होण्याचा फटका बसत आहे. या मुद्द्यावर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
विना वीज या व्यक्तीने चालवला फॅन; व्हिडिओ व्हायरल
Power Cut MemesSaam Tv

नवी दिल्ली: देशाच्या अनेक भागांत कडाक्याचा उष्णता कायम आहे. उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या नागरिकांना वीजपुरवठा खंडित होण्याचाही फटका बसत आहे. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याच्याही चर्चा आहेत, अशा परिस्थितीत विजेचे संकट आणखी वाढू शकते. यादरम्यान सोशल मीडियावर (Social Media) मीम्स व्हायरल होत आहेत.

लोडशेडिंगचा मुद्दा सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रकारचे फनी मीम्स शेअर करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. #PowerCut, #PowerCrisis आणि #CoalShortage हे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.

Power Cut Memes
Nitin Raut : "ऊर्जामंत्र्यांना नाश्ता दिला नाही म्हणून लोणार शहरात अतिरिक्त लोडशेडिंग", आंबेद खान

आयएएस अधिकारी अवनीश शरणनेही एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक व्यक्ती स्वतःच्या हाताने पंखा फिरवून हवा घेण्याचा प्रयत्न करत आहे. 'हे तंत्र भारताबाहेर जाऊ नये' अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.

दिल्ली-एनसीआर, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश या राज्यांसह अनेक राज्यात लोडशेडिंग आहे. केंद्राबरोबरच राज्य सरकारही आपापल्या स्तरावरुन या समस्येतून सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. (Power Cut Memes)

देशातील विविध राज्यांतील विजेचे संकट पाहता, कोळशाची उपलब्धता वेळेवर व्हावी, म्हणून रेल्वेने ४२ पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. कडाक्याच्या उन्हात विजेची मागणी वाढल्याने येत्या काही दिवसांत विजेचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.